कोल्हापूर : गेल्या काही महिन्यापासून चर्चेत असलेल्या करूणा मुंडे यांनी अजून एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसेचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी असं महाराष्ट्राच्या राजकारणावर धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढला तर तो सुपर डुपर चालेल असं वक्तव्य करूणा मुंडे यांनी केले आहे.
माझ्या मुलीचा राजकारणाशी संबंध काय? तर ती आत्महत्या करेल; जितेंद्र आव्हाडांचं धक्कादायक वक्तव्य
मागील वर्षी धनंजय मुंडे यांच्यावर करूणा शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केला होता. तेव्हापासून त्या राज्यात चर्चेत होत्या. त्यावेळी अनेक राजकीय घडामोडी देखील घडल्या होत्या. त्यानंतर त्यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या शिवशक्ती सेना असं नाव ठेवून नवीन पक्ष स्थापन केला आहे. या पक्षाच्या नावावर त्या आता धनंजय मुंडे यांच्या विरोधात आपण परळीतून तर कोल्हापूरच्या उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत देखील उतरणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
रूपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा; राज्यात एकच चर्चा
करूणा मुंडे पुढे म्हणाल्या की, जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची इच्छा आहे. महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणावर काम करणार आहे. कोल्हापूरातील घराणेशाहीचं राजकारण आपण संपवणार आहे. त्यामुळेच कोल्हापुरचा विकास थांबला आहे. देवीच्या आशीर्वादाने विजय प्राप्त होण्याचा विश्वास देखील करूणा मुंडे यांनी व्यक्त केला. तसेच धनंजय मुंडे यांनी स्वत:ची सहा मुले लपवली. तसेच अनेक बायकाही लपवल्या असल्याचं वक्तव्य करूणा मुंडे यांनी केलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यावर काय प्रत्युत्तर देणार ते पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
मग हिजाब, बुरखा घालणाऱ्या राज्यात मुलीला पाठवणार का? जितेंद्र आव्हांना सदाभाऊ खोतांचा सवाल
करूणा मुंडे यांनी म्हटलं आहे की, मी स्वत: चा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या सारख्या अनेक मंत्र्यांच्या पत्नींवर अन्याय होत आहे. त्यातील अनेक महिला माझ्या संपर्कात आहेत, असा दावा देखील त्यांनी केला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात गेल्या 25 वर्षापासून राजकारण कसं चालतंय ही मी पाहत आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि धनंजय मुंडे यांच्यावर चित्रपट काढल्यास तो सुपर डुपर चालेल असंही वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे.
Read also:
- मुख्यमंत्र्याच्या मेहुण्यावर ईडीचं शुक्लकाष्ठ कायम; दुसऱ्या मालमत्तेवर देखील कारवाईचा बडगा
- “आम्ही कधीही पाठीवर वार करत नाही” काॅंग्रेसच्या प्रचारासाठी क्षीरसागरांनी भाजपवर तोप डागली
- “५० वर्षातील कामाचा हिशोब बिंदू चौकात काँग्रेसने द्यावा”; चंद्रकांत पाटलांचा बंटी पाटलांना टोला
- नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरेंचे संबंध काय? किरीट सोमय्यांचा नवा खुलासा
- “शेंडी जानव्याचे राजकारण नको”; विनायक राऊतांच्या वक्तव्यांवरून ब्राम्हण समाज आक्रमक