मुंबई : महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा असताना अशातच अजून एक धक्का महाविकास आघाडीला बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकावर आज ईडीने कारवाई केली आहे. ईडीने उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याची 6 कोटीपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त केली. अशातच आता त्यांच्या दुसऱ्या मालमत्तेवर देखील ईडीने कारवाई सुरू केली आहे.
रूपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा; राज्यात एकच चर्चा
श्रीधर पाटणकर यांच्य ठाण्यातील श्री साईबाबा गृहनिर्माण प्रायव्हेट लिमिटेडवर मंगळवारी कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या पचपाखाडी भागातील दुसऱ्या मालमत्तेवरही कारवाई करण्याची तयारी सुरू केलीय. त्यामुळे ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी काल गृहनिर्माण प्रकल्पाला भेट दिल्याने पाटणकर यांच्यामागे कारवाईचे शुक्लकाष्ठ कायम राहिल असं बोललं जात आहे.
मग हिजाब, बुरखा घालणाऱ्या राज्यात मुलीला पाठवणार का? जितेंद्र आव्हांना सदाभाऊ खोतांचा सवाल
ईडीने आज पुष्पक बुलियन प्रकरणात ठाण्यातील प्रकल्पातील 11 सदनिकावर कारवाई केली आहे. उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालिकीच्या या सदनिका असल्याचं सांगण्यात येत आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरे यांचे भाऊ आणि उद्धव ठाकरे यांचे मेहुणे होत. याअगोदर देखील मनी लॉण्डिंगप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच माहितीच्या आधारे त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे.
‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचा ‘मनसे’ विशेष शो दाखवला जाणार; मनसे ‘ते’ ट्विट चर्चेत
कर्जत येथील वैजनाथ देवस्थान येथील जमीनाचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्यांनी केला होता. वैजनाथ येथील शंकराचे देवस्थान असून त्याठिकाणी हा प्रकार झाल्याचा आरोप होता. त्यात एका सलीम नावाच्या व्यक्तीच्या नावावर ती जमीन केली होती. त्यानंतर ती जमीन श्रीधर पाटणकर यांच्यानावे केला असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.
Read also:
- “आम्ही कधीही पाठीवर वार करत नाही” काॅंग्रेसच्या प्रचारासाठी क्षीरसागरांनी भाजपवर तोप डागली
- “५० वर्षातील कामाचा हिशोब बिंदू चौकात काँग्रेसने द्यावा”; चंद्रकांत पाटलांचा बंटी पाटलांना टोला
- नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरेंचे संबंध काय? किरीट सोमय्यांचा नवा खुलासा
- “शेंडी जानव्याचे राजकारण नको”; विनायक राऊतांच्या वक्तव्यांवरून ब्राम्हण समाज आक्रमक
- माझ्या मुलीचा राजकारणाशी संबंध काय? तर ती आत्महत्या करेल; जितेंद्र आव्हाडांचं धक्कादायक वक्तव्य