मुंबई : जम्मू काश्मिरमधील हिंदू पंडितांवर आधारीत असलेला काश्मिर फाईल्स चित्रपटाची चर्चा देशात जोरदार सुरू आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी हा चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी करीत आहे. या चित्रपटावरून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. अशातच आता मनसेने याबाबत भूमिका घेतली आहे.
“सगळ्या गोष्टी बाहेर आल्या तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोप उडणार”; किरीट सोमय्यांचा एल्गार
मनसेचे सरचिटणी संदीप देशपांडे यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटाबद्दल एक ट्विट केलं आहे. त्यात महाराष्ट्रा नवनिर्माण सेनेच्यावतीने माहीम विधानसभा मतदारसंघात द काश्मीर फाईल्स चित्रपटाचा विशेष शो दाखवला जाणार आहे. 24 मार्च 2022 रोजी संध्याकाळी सव्वा सात वाजता माहीममधील एल.जे रोडवरील सिटी लाईट चित्रपटगृहात हा शो दाखवला जाणार आहे. असा फोटो त्यांनी त्या ट्विट मध्ये जोडला आहे.
राणें पाठोपाठ मोहित कंबोज निशाण्यावर; मुंबई महानगरपालिकेडून राहत्या सोसायटीमध्ये झाडाझडती
द काश्मीर फाईल्स चित्रपटावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं असताना मनसेने हा चित्रपट लोकांना मोफत दाखवण्याचे ठरविले आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ठिकाण, वेळ दर्शविणारा एक फोटो ट्विट केला आहे. त्यामुळे राज्यात आता राजकारणाला एक नया आयाम मिळण्याची शक्यता आहे.
काश्मीर फाईल्स इंटरवलनंतर फार बोरिंग सिनेमा; जयंत पाटलांचा फडणवीसांना मिश्कील टोला
दरम्यान, आज देवेंद्र फडणवीसांच्या प्रश्नाला प्रत्युत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, काश्मीर फाईल्स इंटरवल नंतर फार बोरिंग सिनेमा आहे. या चित्रपटांचं इतकं कौतुक आहे तर 17 कोटीचा चित्रपट 150 कोटीचा फायदा झाला . त्यामुळे त्या चित्रपट निर्मात्याला काश्मिर पंडितांना दान करायला सांगा, असं फडणवीसांना उद्देशून जयंत पाटील म्हणालेत. त्यांना घरं बांधायला ते पैसे द्या, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं.
#kashmirifiles pic.twitter.com/hYcZZpkweB
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 22, 2022
Read also:
- महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा विजयी झाला तर राजकारण सोडून देईन: अरविंद केजरीवाल
- “आता भाजपच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून ते..”; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला सतेज पाटलांचं प्रत्युत्तर
- “बंटी पाटील हा माणसं खाणारा माणुस”; चंद्रकांत पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
- आयुक्त कैलाश जाधवांच्या बदलीचे नक्की कारण काय? नाशिक पालिकेत रमेश पवार यांची नियुक्ती
- पुणे स्थायी समिती अध्यक्ष अधिकार वाद; महापालिकेच्या विरोधात हेमंत रासने थेट न्यायालयात