मुंबई : जम्मू काश्मिरमधील हिंदू पंडितांवर आधारीत असलेला काश्मिर फाईल्स चित्रपटाची चर्चा देशात जोरदार सुरू आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी हा चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी करीत आहे. या चित्रपटावरून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. अशातच आज विधानसभेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काश्मीर फाईल्सवरून वक्तव्य केले असता त्याला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांचा चिमटा काढला.
तुम्ही सगळे श्रेय घ्या, पण एसटीचा संप मिटवा; चंद्रकांत पाटलांचं राज्य सरकारला आवाहन
काश्मिर फाईल्स वरून देशात एव्हाना राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपच्या काही नेत्यांनी थेटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघितला तसेच त्यांनी लोकांना देखील चित्रपट बघण्याचे आवाहन केले. यावरून विधानसभेत विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांमध्ये जोरदार घमासाम सुरू झालं. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही काश्मीर फाईल्स बघायला गेलो होतो. तुम्हाला काही अडचण आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
उच्च न्यायालयाकडून नारायण राणेंना अधिश बंगल्याप्रकरणी दिलासा ; नितेश राणेंचा सेनेला ‘हा’ गंभीर इशारा
देवेंद्र फडणवीसांच्या प्रश्नाला प्रत्युत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, काश्मीर फाईल्स इंटरवल नंतर फार बोरिंग सिनेमा आहे. या चित्रपटांचं इतकं कौतुक आहे तर 17 कोटीचा चित्रपट 150 कोटीचा फायदा झाला .त्यामुळे त्या चित्रपट निर्मात्याला काश्मिर पंडितांना दान करायला सांगा, असं फडणवीसांना उद्देशून जयंत पाटील म्हणालेत. त्यांना घरं बांधायला ते पैसे द्या, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं.
अध्यक्षपद निवडणुकीचा प्रस्ताव राज्यपालांनी फेटाळला; सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष पेटणार
दरम्यान, काश्मीर फाईल्स चित्रपटांवरून पुन्हा एकदा काश्मिरचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावरून सध्या राज्यात एव्हाना देशात मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की, माझ्या हातात शस्त्र असती तर माझ्या शिवसैनिकांना शस्त्र घेऊन तुमच्यासाठी पाठवली असती. असं शिवप्रमुखांनी त्यावेळी सांगितलं होतं. मात्र आता काश्मिर प्रश्नांवर सरकार लक्ष देत नसल्याची टीका देखील त्यांनी केली.
Read also:
- गुढी पाडव्याला मनसेचे मुबंईत विराट शक्तिप्रदर्शन; महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे रणशिंग फुंकणार
- रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण; पुणे पोलीस उपायुक्त पंकड डहाणे यांची कसुन चौकशी
- “आगे आगे देखो होता है क्या”; ईडीच्या कारवाईनंतर राणेंचा शिवसेनेला सूचक इशारा
- “आता ही ईडी गावागावात गेलीय “; मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकावर झालेल्या कारवाईनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
- उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई; 6 कोटीपेक्षा अधिक संपत्ती जप्त