मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकारणाला चांगलाच ऊत आलेला दिसत आहे. शिवसेना सध्या मुंबई महानगरपालिकेच्या केंद्रस्थानी असल्याने शिवसेना नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांकडून जबरदस्त छापेमारी सुरु आहे. एकाबाजूला छापेमारी सुरु आहे तर दुसऱ्या बाजूने महानगरपालिकेच्या नोटिसा भाजपच्या नेत्यांना मिळत आहेत. एकमेकांवर चिखलफेक करण्याची एकही संधी दोन्ही पक्ष सोडत नाही अशी काहीशी परिस्थिती समोर आली आहे.
उच्च न्यायालयाकडून नारायण राणेंना अधिश बंगल्याप्रकरणी दिलासा ; नितेश राणेंचा सेनेला ‘हा’ गंभीर इशारा
आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या थैमानानंतर आता मनसेचा मुंबईत पाडव्या निमित्ताने मेळावा होणार आहे. मुंबई महानगरपालिका तोंडावर असल्याने आता मनसे या मेळाव्यात अतिविराट गर्दी करून जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
अध्यक्षपद निवडणुकीचा प्रस्ताव राज्यपालांनी फेटाळला; सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष पेटणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आगामी निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतून रणशिंग फुकणार आहे असा अंदाजही वर्तविण्यात येत आहे. मनसेच्या प्रमुख नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हा मेळावा आमच्यासाठी एक उत्सवच असल्याचं आधीच स्पष्ट केल्याने हा मेळावा अतिभव्य होणार असल्याचे आधीच संकेत मिळत आहेत. मनसेचे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी मनसेच्या २ एप्रिल गुढीपाडव्याच्या दिवशी होणाऱ्या मेळाव्याबद्दल माहिती दिली आहे. मनसेच्या या मेळाव्यासाठी सर्व अधिकृत परवानग्या पालिकेकडून घेण्यात आलेल्या आहेत. या मेळाव्यातून राज ठाकरे सर्व प्रश्नांना उत्तर देणार आहेत. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने यंदाच्या पाडवा मेळाव्याला विशेष महत्व आहे, असं यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं.
RSS च्या मुस्लिम शाखा उघडणाऱ्या सरसंघचालकांना फडणवीस ‘जनाब’ म्हणणार का?
सध्या जी काही चिखलफेक महाविकास आघाडी सरकार आणि भाजपच्या नेत्यांमध्ये सुरु आहे त्याला जनता वैतागलेली दिसत आहे. मनसे तिसरा पर्याय म्हणून समोर येऊ शकते मात्र त्यांना जोरदार तयारी करावी लागेल असं बोललं जातं आहे.
Read also:
- रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण; पुणे पोलीस उपायुक्त पंकड डहाणे यांची कसुन चौकशी
- “आगे आगे देखो होता है क्या”; ईडीच्या कारवाईनंतर राणेंचा शिवसेनेला सूचक इशारा
- “आता ही ईडी गावागावात गेलीय “; मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकावर झालेल्या कारवाईनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
- उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई; 6 कोटीपेक्षा अधिक संपत्ती जप्त
- तुम्ही सगळे श्रेय घ्या, पण एसटीचा संप मिटवा; चंद्रकांत पाटलांचं राज्य सरकारला आवाहन