नागपूर : शिवसेना नेते संजय राऊत हे नागपूरच्या दौऱ्यावर आले आहेत. मागील आठवड्यात भाजपचे नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील भाजपच्या विजयानंतर नागपुरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणशिंग फुकले. भाजपची महाराष्ट्रात एक हाती सत्ता आणणार असं त्यांनी छाती ठोकून सांगितलं.
सोलापुरात सचिन वाझे पॅटर्न स्टिंग ऑपरेशनमुळे महाविकास आघाडीला दुसरा धक्का
त्यानंतर संजय राऊत हे नागरपूरच्या दौऱ्यावर आल्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले होते. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षावर अत्यंत आक्रमकपणे टीका केली आहे. सध्या भाजपकडून काश्मीर फाईल्स चित्रपटाच जोरदार समर्थन सुरु आहे. दस्तुरखुद्द पंतप्रधान पदी बसलेला माणूस या चित्रपटाच्या समर्थनार्थ वक्तव्ये करत आहेत.
“कोल्हापूर उत्तरेत महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्याची जबाबदारी क्षीरसागरांवर “; ठाकरेंचे आदेश
हे सगळं ठीक असलं तरी मुस्लिम समाजाला देशात राहू नका म्हणणारे खरे हिंदू असूचं शकत नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. भाजप मुस्लिम विरोधी वातावरण तयार करण्यात धन्यता मानत आहे. मात्र ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जीवावर ते इथपर्यंत आले आहेत त्या संघाच्या सरसंघचालक मोहन भागवतांनी संघाच्या मुस्लिम शाखा काढल्या आहेत. भाजपने त्याकडे मात्र दुर्लक्ष केलं आहे.
“२० वर्षांपासून सातत्याने भ्रष्टाचार करणाऱ्या दरेकरांची आमदारकी काढा”; काँग्रेसची आक्रमक मागणी
देवेंद्र फडणवीसांनी एमआयएमने राष्ट्रवादीला सत्तेत येण्यासाठी ऑफर दिल्यानंतर शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवसेनेचा काहीही संबंध नसताना देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनवर टीका केली. आता मुस्लिम शाखा उघडणाऱ्या सर संघचालकांना जनाब म्हणणार का ? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा गैरफायदा; मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडावी यावरून शिवसेनेची टीकाdevendra fadanvis
भाजपने कितीही दहशत केली तरी महाविकास आघाडी सरकार पडणार नाही हे आता त्यांनी लक्षात घ्यावं. शिवसेनचं संघटन हीच शिवसेनेची ताकद असल्याने आता शिवसेनेच्या नादाला त्यांनी लागूच नये. महाविकास आघाडी सरकार आगामी काळातील सगळ्या निवडणूका एकत्रितपणे लढणार आहेत असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Read also:
- ”..तर मी त्यांच्याशिवाय आघाडीत राहीन ”; स्वाभिमानी संघटनेच्या एकमेव आमदारांचा राजू शेट्टींना घरचा आहेर
- शिवसेनेनं मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडावी; संजय राऊतांनी स्पष्टचं केलं
- 13 सहकारी कारखाने पवार कुटुंबीयांनी हटप केले; लिलाव काढून 400 कोटी कारखाना 10 कोटीला
- मी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असल्याने माझा छळ; एकनाथ खडसेंचे फडणवीसांवर गंभीर आरोप
- आपची राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर ; मात्र मराठी अभिनेता संदीप पाठकची प्रतिक्रिया व्हायरल