पुणे : गेल्या महिन्यात मुंबै जिल्हा सहकारी बँकेचा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकार आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आक्रमक खेळीमुळे महाविकास आघडीचा जिल्हा बँकेत दणदणीत विजय झाला. यानंतर माजी अध्यक्ष प्रवीण दरेकर यांचे बँकेचे सदस्यत्व रद्द झाले झाले.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक भाजप जिंकेल; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा दावा
आता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी याबाबत महाविकास आघाडीच्या घटकपक्षांतून आक्रमक मागणी होत आहे. मुंबै जिल्हा बँकेत २०१३-१४ ते २०१९-२० या कालावधीत २००० कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे. सर्वसामान्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या आमदारकीचा राजीनामा घेऊन, त्यांचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद सुद्धा ताबडतोब काढून घेण्यात यावे, अशी मागणी जगताप यांनी केली आहे. मुबंईत घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत भाई जगतापांसहित मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, कोषाध्यक्ष भूषण पाटील आणि सहकोषाध्यक्ष अतुल बर्वे उपस्थित होते.
33 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम फक्त इव्हेंटबाजी; मनिषा कांयदेचा भाजपवर हल्लाबोल
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये मजूर म्हणून नोंद असलेले आणि आता मुंबई बँकेचे पूर्वीचे अध्यक्ष आणि संचालक म्हणून काम पाहिलेल्या प्रवीण दरेकर यांनी बँकेमध्ये २००० कोटींचा घोटाळा केलेला आहे. सहकार विभागाच्या चौकशीमध्ये जो अहवाल समोर आला आहे त्यामध्ये ही माहिती समोर आलेली आहे. त्यानुसार त्यांच्यावर सरकारने भारतीय दंड विधान ४२० कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे.
मैदानात येऊन आमच्याशी लढा, नामर्दांसारख्या आम्हाला नोटीसा पाठवू नका; नितेश राणेंची बोचरी टीका
गेल्या २० वर्षांपासून श्रीमंत असूनही स्वतःला मजूर म्हणवत फसवणूक करून, मुंबै जिल्हा बँकेवर संचालक म्हणून निवडून येत आहेत. गेल्या २० वर्षांमध्ये मुंबई बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झालेले, असून त्याबाबत सहकार विभागाने वेळोवेळी सहकार कायदा १९६० च्या कलम ८९ अ अंतर्गत चौकशी करून अहवाल दिलेले आहेत, अशी माहिती भाई जगताप यांनी दिली आहे.
Read also:
- उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा गैरफायदा; मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडावी यावरून शिवसेनेची टीका
- नागपुरकरांना मुंबई प्रिय तर आम्हा लोकांना नागपुर; संजय राऊतांचा फडणवीसांना चिमटा
- ” हिंदुत्वातलं जाज्वल्य सोडलं अन् सत्तेसाठी स्वाभिमान गहाण ठेवलं “
- नवाब मलिकांना अजून एक न्यायालयाचा दणका; दिलासा नाहीच
- “शिवसेनेनं मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडावी”