सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना भाजप संघर्ष जास्तच चिघळत चालेला बघायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई महानगरपालिकेने अनिधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. नारायण राणे यांच्या जुहु येथील अधीश बंगल्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर भाजपनेते नितेश राणे हे शिवसेनेवर सातत्याने टीका करीत आहेत. अशातच आता त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अगदी खालच्या पातळीवर टीका केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण सध्या वेगळ्याच वळणावर जाण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवडमधील आत्मकेंद्री राजकारण्यांना आमदार महेश लांडगेंची ‘ॲ लर्जी’
मागील काही महिन्यांपासूून मुख्ममंत्री उद्धव ठाकरे आजारपणामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे ते सध्या घरीच बसून काम करीत आहेत. त्यावरून त्यांच्यावर निशाणा साधताना नितेश राणे म्हणाले की, घराच्या बांधकामावरून मिळालेल्या नोटीसीला कायदेशीर उत्तर देऊ, मुख्यमंत्री घरात बसुन कंटाळलेले नाहीत. परंतु आम्ही त्यांना घरात बसलेलं बघून कंटाळलो आहोत. नोटीसा पाठवण्यापेक्षा मैदानात येऊन आमच्याशी लढा. मर्दांसारखे लढा. नामर्दांसारख्या आम्हाला नोटीसा पाठवू नका, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे.
”धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढल्यास तो सुपर डुपर चालेल”; करूणा शर्माचं वादग्रस्त वक्तव्य
तसेच ते पुढे म्हणाले की, संजय राऊतांसारखी माणसं सोलापूरच्या बाजारात खुप भेटतात. त्याला किती महत्व द्यायंचं हे महाराष्ट्रातल्या सर्वच राजकारण्यांनी ठरवून घेतलंय. ज्याला शरद पवारही महत्व देत नाहीत. त्याला आम्ही का महत्व द्यायचं, अशा विकत मिळालेल्यांबद्दल बोलू नये असं म्हणतात. ज्यांना हिंदूविषयी द्वेष आहे. तेच आज महाराष्ट्रात महाविकास आघाडीत एकत्र आले असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
“आम्ही नुसतं म्हणायचं ठाकरे सरकार मात्र हे तर पवार सरकार “; गजानन कीर्तिकारांचा शिवसेनेला घरचा आहेर
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जुहू येथे अनधिकृत बांधकाम केल्याने नोटीस पाठवली होती. त्यानंतर नोटीस दिलेल्या तारखेपर्यंत बांधकाम हटवलं नाही तर पालिकेकडून कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नारायण राणेंना दिला होता. अशातच आता महापालिकेने नारायण राणेंना दिलेला कालावधी आता संपला आहे. त्यामुळे नारायण राणे यांनी आता थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Read also:
- भाजपचे वरचे नेते अनुकुल मात्र..; पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार दिल्याने सतेज पाटलांची प्रतिक्रिया
- मग तुमच्या सरकारच्यावेळी महाराजांचा विधानसभेत फोटो का नाही लावला? अजित पवारांचं भाजपला प्रत्युत्तर
- ठाकरे सरकार हे डोक्यावर पडलेलं सरकार; तथाकथित रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणी चित्रा वाघ कडाडल्या
- तथाकथित रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरण पेटलं; पीडित तरुणीचे संजय राऊत, नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप
- नारायण राणेंच्या अडचणीत वाढ; ‘अधीश’ बंगला प्रकरणी उच्च न्यायालयात धाव