मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्षांचं मिळून सरकार अस्तित्वात आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तीनपक्षांची युती आहे. मात्र या तीन पक्षांच्या युतीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं वेळावेळी समोर आलं आहे. हे तिन्ही पक्ष एकमेकांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाही हे मात्र विशेष.
“भारतामधील रस्त्यांचं जाळं 2024 पर्यंत अमेरिकेच्या बरोबरीचे असणार” ; नितीन गडकरी
खासदार गजानन कीर्तिकर यांनी आपली थेट नाराजीची भूमिका मांडली आहे आणि शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिर्दे येथे ब्राम्हणवाडी ते कोळबांद्रे रस्त्याच्या डांबरीकरण कार्यक्रमावेळी खासदार गजानन कीर्तिकर यांनी थेट महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरु असलेल्या दुजाभावाबद्दल बोलून दाखवली आहे.
“कुठं मरगळ आली असेल तर झटकून टाकावी”; शिवसेनेचे 22 मार्चपासून शिवसंपर्क अभियान
एका आमदाराला त्याच्या मतदारसंघात विकासकामासाठी शासनाकडून निधी आण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागत आहेत. विकास कामांच्या निधीमध्ये सध्या नुसती पळवापळवी सुरु आहे. ग्रामविकास मंत्रालयाच्या २५ /१५ योजनेमधून निधी मिळविण्यासाठी सध्या शिवसेनेच्या आमदारांना मोठी स्पर्धा करावी लागत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बाबतीत मात्र सर्व काही सुरळीत आहे. मुंबईमध्ये आम्हाला हा प्रश्न सतावत नाही. याविषयी शिवसेनेचे मुंबईमध्ये नागरोत्थान, नगरविकासचा निधी मिळतो. मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही निधी मिळवितो. मात्र शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या आमदारांना निधीबाबत जास्त वजन मिळत आहे. आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेतो तर पवार सरकार घेते असं म्हणत गजानन कीर्तिकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी देखील अशीच नाराजी काही दिवसांपूर्वी एका सभेत जाहीरपणे बोलून दाखवली होती. शिवसेना नेते संजय राऊत हे रोज पत्रकार परिषद घेऊन सरकार एकदम स्थिर आहे वगैरे वगैरे सांगत असतात मात्र प्रत्यक्षात सर्व काही आलबेल नाही असं शिवसेना नेते बऱ्याच वेळा सांगत असतात. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also:
- कोल्हापूर उत्तरेत शिवसेनेची तलवार म्यान; पारंपरिक मतदारसंघ सोडला काँग्रेसला
- ” शिवसेना हा दिशा, तत्व नसलेला पक्ष “; केंद्रीय मंत्री राणेंची शिवसेनेवर जहरी टीका
- पेन ड्राईव्हनंतर आता ‘सीडी’ बाहेर येणार; एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
- “आमचे आई-बाप काढू नका “; केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना सुप्रिया सुळेंनी झाप-झाप झापलं
- प्रवीण दरेकरांना उच्च न्यायालयाचा दणका; मुंबै बॅंक निवडणुक प्रकरणी याचिका फेटाळली