मुंबई : राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणुक लढवली असल्याने त्यांच्यावर मुंबई पोलिसांकडून माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
दिशा सालीयन प्रकरणी राणे पिता पुत्राला जामीन मंजूर होताच; नितेश राणेंचा राज्य सरकारवर पलटवार
मागच्या निवडणुकीत मुंबै जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत मजूर आणि नागरी सहकार बॅंक अशा दोन्ही ठिकाणांहून प्रवीण दरेकर यांनी अर्ज दाखल केला होता. त्या दोन्ही निवडणुकीत प्रवीण दरेकर निवडून आले होते. मात्र निवडणुकीच्या निकाल अधिकृतपणे जाहीर होत असतानाच दरेकर यांना मजूर वर्गासाठी अपात्र घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला होता.
काश्मिर पंडितांची वेदना जेवढी शिवसेनेला माहित आहे, तेवढी अन्य कुणालाही नाही: संजय राऊत
प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. याचे पडसाद सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील बघायला मिळाले . यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील याप्रकरणावर भाष्य केलं होतं.
“जी-23 म्हणजे काॅंग्रेसचे सडके कांदे”; संजय राऊतांची काॅंग्रेसवर खरमरीत टीका
त्यानंतर सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांची चौकशी सुरूच ठेवली होती. दरेकर यांनी ज्या मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून मुंबै बॅंकेची निवडणुक लढविली होती. त्या प्रतिज्ञा पत्रात मजूर संस्थेत ते रंगारी असल्याचे दाखवण्यात आले होते. त्यामुळे आता हा वाद न्यायालयात गेल्यास प्रवीण दरेकर कशाप्रकारे आपली बाजू मांडणार ते आता पहावे लागणार.
Read also:
- “भारतामधील रस्त्यांचं जाळं 2024 पर्यंत अमेरिकेच्या बरोबरीचे असणार” ; नितीन गडकरी
- “कुठं मरगळ आली असेल तर झटकून टाकावी”; शिवसेनेचे 22 मार्चपासून शिवसंपर्क अभियान
- महाराष्ट्रातचं काय? काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत करा ना टॅक्समुक्त; काश्मिर फाईल्स चित्रपटावरून अजित पवारांनी सुनावलं
- स्वातंत्र्यसैनिक भगतसिंह यांच्या मुळ गावी झाला भगवंत मान यांचा शपथविधी; पंजाबनंतर आपचं पुढचं नियोजन ठरलं
- नेत्यांचे फोन टॅप करण्याचा गुजरात पॅटर्न समोर आणणार; रश्मी शुक्ला प्रकरणावरून पटोलेंचा इशारा