नवी दिल्ली : पारंपारिक पक्षाला सोडचिठ्ठी देत पंजाबला अखेर नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत आपने ऐतिहासिक विजय मिळवला. यावेळी भगवंत मान हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते. भगवंत मान हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय आहेत. या आधीही मान हे दोनवेळा आपचे खासदार म्हणून निवडून आले होते. आज त्यांनी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी क्रांतिकारक भगतसिंग यांच्या मुळगावी शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि इतर दिग्गज नेते उपस्थित होते.
अध्यक्षपद निवडणुकीचा प्रस्ताव राज्यपालांनी फेटाळला; सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष पेटणार
भगवंत मान यांचा शपथविधी क्रांतीवीर भगतसिंह यांच्या खटकर कलां या मुळगावी पार पडला. यावेळी ते म्हणाले की, या गावात शपथ घेण्याचे एक खास कारण आहे. या गावात महान क्रांतिकारक भगतसिंह यांचा जन्म झाला होता. अनेक नेते राजवाड्यात आणि महालात शपथ घेतात पण आम्ही स्वातंत्र्य सैनिकांच्या गावात जाऊन शपथ घेतली. तसेच ते पुढे म्हणाले की, भगतसिंग हे कायम आमच्या हृदयात राहतील. एक मुख्यमंत्री म्हणून नेहमीच जनतेच्या समस्या दूर करण्याचा मी प्रयत्न करणार.
“एकनाथराव तुम्ही ती २५ आमदारांची यादी द्या! सरकार कसं बनवायचं मी तुम्हाला सांगतो”
काही दिवसांपूर्वी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यात आपने तब्बल ९२ जागांवर विजय मिळवला. पंजाबच्या इतिहासात एवढे बहुमत पहिल्यांदा एका पक्षाला मिळाले होते. आपने या निवडणुकीत कॉंग्रेसचा सुपडा साफ करत एकहाती सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे पंजाबच्या विधासभेत आता आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्री बसणार आहे.
शेतकऱ्यांचा तळतळाट या सरकारला खाली खेचणार; वीजकापणीवरून माजी ऊर्जामंत्र्याचं वक्तव्य
पंजाबमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत आपने आता हिमाचल प्रदेशमधील विधानसभेच्या पुर्ण जागा लढवण्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्रात देखील आप पक्ष हळूहळू उदयास येऊ लागला आहे. त्यामुळे आगामी काही वर्षात अरविंद केजरीवाल यांनी पुर्ण भारतात आप पक्ष विस्तारण्याचे ठरविले आहे.
Read also:
- नेत्यांचे फोन टॅप करण्याचा गुजरात पॅटर्न समोर आणणार; रश्मी शुक्ला प्रकरणावरून पटोलेंचा इशारा
- दिशा सालीयन प्रकरणी राणे पिता पुत्राला जामीन मंजूर होताच; नितेश राणेंचा राज्य सरकारवर पलटवार
- काश्मिर पंडितांची वेदना जेवढी शिवसेनेला माहित आहे, तेवढी अन्य कुणालाही नाही: संजय राऊत
- “जी-23 म्हणजे काॅंग्रेसचे सडके कांदे”; संजय राऊतांची काॅंग्रेसवर खरमरीत टीका
- मराठीच्या मुद्द्यावरून मनसेचं पुन्हा ‘खळखट्याक’; आयपीएलसाठी परराज्यातून आणलेल्या सर्व बसेस फोडल्या