मुंबई : आगामी काळात मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जोरदार नियोजन करण्यात आले आहे. रखडलेली बरीच समाजपयोगी कामे सध्या पूर्णत्वास नेण्याचे कार्य सध्या सत्ताधारी शिवसेनेकडून सुरु आहे. दुसरीकडे विरोधी भाजप देखील सध्या जोरदार तयारी करत आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची होणार यात मात्र आता तिळमात्र शंका राहिलेली नाही.
” दरेकरांनी त्यांचं नाव बदलून दरोडेखोर ठेवावं”; नाना पटोलेंची दरेकरांवर जहरी टीका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे मराठी आणि हिंदुत्तवाच्या मुद्यावरून आक्रमक झाले आहेत. मागील काही आठवड्यांमध्ये झालेल्या भाषणात त्यांनी संजय राऊत आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून जोरदार ठाकरी दणके दिले आहेत.
भाजपला ते आंदोलन भोवलं; भाजपच्या आमदारासह अन्य 23 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
काल संध्याकाळच्या सुमारास देखील मनसेने मराठीच्या मुद्यावर आक्रमक होऊन ताज हॉटेल्सच्या बाहेर बसेसची तोडफोड केली आहे. महाराष्ट्रात सध्या काही दिवसांमध्येच आयपीएलचे सामने होणार आहेत. या सामन्यांसाठी खेळाडुंसाठी परराज्यातून मागवलेल्या लक्झरी बसच्या मुद्द्यावरून मनसेने चांगलाच राडा घातला आहे. मनसेच्या वाहतूक सेनेच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री ताज हॉटेलच्या परिसरात उभ्या असणाऱ्या लक्झरी बसेसची तोडफोड केली आहे. २६ तारखेपासून मुंबईत सामने सुरु होणार आहेत आणि यासाठी खेळाडूंना ये-जा करण्यासाठी बसेसची सुविधा आहे. या सर्व बसेस गुजरात आणि दिल्लीहून मागवण्यात आल्या आहेत.
” दरेकरांवरील कारवाई सूडबुद्धीने नव्हे तर सडक्या बुद्धीने “; आशिष शेलारांचा राज्य सरकारवर घणाघात
आयपीएलचे सामने हे मुंबईत होणार आहेत. मात्र बसेस गुजरात, दिल्लीच्या का आणायच्या ? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. यावरच आक्षेप घेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी बाहेरगावातून आणलेल्या या लक्झरी बसेसला विरोध केला आहे. याच रागातून मनसेच्या वाहतूक सेनेच्या कार्यकर्त्यांनी ताज हॉटेलच्या परिसरात उभ्या असणाऱ्या बसगाड्यांना लक्ष्य केले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी या बसेसच्या काचा आणि आरसे तोडले.
Read also:
- अध्यक्षपद निवडणुकीचा प्रस्ताव राज्यपालांनी फेटाळला; सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष पेटणार
- “एकनाथराव तुम्ही ती २५ आमदारांची यादी द्या! सरकार कसं बनवायचं मी तुम्हाला सांगतो”
- शेतकऱ्यांचा तळतळाट या सरकारला खाली खेचणार; वीजकापणीवरून माजी ऊर्जामंत्र्याचं वक्तव्य
- गावसकर, सचिन विराटसारखे दिग्गज संन्यास घेतात; मग काॅंग्रेसची धुरा नव्या नेतृत्वाकडे का नाही?
- महाविकास आघाडी सरकार झुकती है! बस झुकानेवाला चाहिए