मुंबई : गेल्या महिन्यात मुंबै जिल्हा सहकारी बँकेचा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकार आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आक्रमक खेळीमुळे महाविकास आघाडी सरकारचा जिल्हा बँकेत दणदणीत विजय झाला. यानंतर माजी अध्यक्ष प्रवीण दरेकर यांचे बँकेचे सदस्यत्व रद्द झाले झाले .
ईडीच्या कारवाई प्रकरणी नवाब मलिकांना उच्च न्यायालयचा झटका ; याचिका फेटाळल्याने मलिक अडचणीत
यानंतर सध्याच्या घडामोडीमुळे राजकीय वातावरण तापलं असल्यामुळे महाविकास आघाडीने आता भाजपला घेरण्यासाठी काही प्रमुख नेत्यांना टार्गेट केले आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर बॅंकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणुक लढवली असल्याने त्यांच्यावर मुंबई पोलिसांकडून माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण देरकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता! मुंबै जिल्हा बॅंक निवडणुक प्रकरणी गुन्हा दाखल
यावरून विधिमंडळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जर महाविकास आघाडी अशा पद्धतीने आमच्यावर दबाव टाकणार असेल तर आम्ही देखील या दबावाला झुगारून प्रतिकार करू असं ठणकावून सांगितलं आहे. आमदार आशिष शेलार यांनी देखील याबाबत निषेध व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी सरकार हि जी काही सडक्या बुद्धीने कारवाई करत आहे ती अत्यंत चुकीची आहे. ज्या पद्धतीच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यावर आम्ही कायदेशीर भूमिका मांडणार आहे.
” खासदार सुजय हा अत्यंत नम्र अन् विनयशील “; खासदार सुजय विखेंबद्दल बाळा नांदगावकरांचे आपुलकीचे बोल
मोठ्या मोठ्या नेत्यांवर अशी जाणून बुजून काही कारवाई करता हे देखील आता आम्ही बघणार आहे. प्रवीण दरेकर यांच्यावर फसवणुकीचा ४२० गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व बदल्याच्या भावनातून दाखल करण्यात आलेलं आहे असंच सध्या तरी दिसून येत आहे. आगामी काळात या महाभ्रष्टाचारी सरकारला योग्य पद्धतीने उत्तर देऊ असं देखील आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
Read also:
- मलिकांचा राजीनामा घ्या; नाही तर ठाकरे-पवार सरकारने सरकारी जावई घोषीत करा: राम सातपुते
- रुकावटे है ज़रूर पर हौसले ज़िंदा है! 14 दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर नवाब मलिकांची प्रतिक्रिया व्हायरल
- बच्चू कडूंचं नाव निजामुद्दीन शेख तर पटोलेंचा अमजद खान; वळसे पाटलांनी केला घटनेचा उलगडा
- “घर का काॅंग्रेस नकोय, सब की काॅंग्रेस हवंय”; ज्येष्ठ काॅंग्रेस नेते कपिल सिब्बल यांचं वक्तव्य
- नवाब मलिकांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली