मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पक्ष, केंद्रीय यंत्रणा विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात जोरदार संघर्ष सुरु झालेला आहे. संबंध महाराष्ट्रात हा राजकारण्यांचा सुरु असलेला खेळ पाहत आहे. यामध्ये वारंवार भ्र्रष्टाचारचे आरोप केले जात आहेत. एकमेकांवर चिखल फेक करण्याची एकही संधी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सोडत नाही हे मात्र विशेष आहे.
चक्क दाऊदची माणसं आपण वक्फ बोर्डावर नियुक्त केलीत! देवेंद्र फडणवीसांनी सादर केला दुसरा पेन ड्राईव्ह
मागील काही दिवसांपूर्वी कुख्यात देशद्रोही अतिरेकी दाऊद इब्राहिम आणि त्याची बहीण हसीना आपा यांच्यासोबत एका जमिनीचा व्यवहार केल्या प्रकरणी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली होती आणि सध्या ते अटकेत आहेत.
विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी फोडला दुसरा राजकीय बॉम्ब! राज्यात एकच खळबळ
आपल्याला झालेली अटक ही बेकायदेशीर आहे असं म्हणत नवाब मलीक यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र उच्च न्यायालयाने नवाब मालिकांना दिलासा न देता एक दणका दिला आहे. नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. सदरील प्रकरण हे २२ वर्षांपूर्वीचे आहे असं नवाब मलिक यांनी याचिकेत म्हटलं होतं. ईडीने केलेली कारवाई चुकीची आहे आणि बेकायदेशीर आहे असं देखील नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. मात्र उच्च न्यायालयाने तांत्रिक बाबी आणि प्रकरणाचं गांभीर्य ओळखून नवाब मलिक यांनी केलेली याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे आता मालिकांना जबरदस्त धक्का बसला आहे.
नोटीस आम्हालाही येतात परंतु आम्ही तमाशा केला नाही! संजय राऊतांचा भाजपला खोचक टोला
दरम्यान, याआधी नवाब मलिक यांनी केलेल्या तीन मागण्या न्यायालयाने मान्य केल्या होत्या. ईडीच्या कोठडीत असताना घरचे जेवण मिळावे, चौकशीदरम्यान आपल्या वकिलांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी आणि रोजची औषधे घेऊ द्यावीत, अशा तीन मागण्या करण्यात आल्या होत्या. या तिन्ही मागण्यांना न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला होता.
Read also:
- प्रवीण देरकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता! मुंबै जिल्हा बॅंक निवडणुक प्रकरणी गुन्हा दाखल
- पुण्यात इच्छुकांच्या भाऊ-गर्दीचा लाखोंचा खर्च पाण्यात; प्रभाग रचना रद्द झाल्याने भावी नगरसेवक हवालदिल
- ” खासदार सुजय हा अत्यंत नम्र अन् विनयशील “; खासदार सुजय विखेंबद्दल बाळा नांदगावकरांचे आपुलकीचे बोल
- लांबे यांच्यासोबत फडणवीसांचा फोटो व्हायरल! मलिकांवर केलेल्या आरोपांबद्दल सना मलिकने फडणवीसांची हवाच काढली;
- त्यामुळेच उगाचच दाऊद दाऊद करून..; फडणवीसांनी फोडलेल्या दुसऱ्या बॉम्बवर दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया