मुंबई : राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणुक लढवली असल्याने त्यांच्यावर मुंबई पोलिसांकडून माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य सरकार सुडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप देखील भाजपकडून केला आहे. त्यानंतर राज्यात भाजपचे नेते आक्रमक झालेले बघायला मिळाले आहेत.
विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी फोडला दुसरा राजकीय बॉम्ब! राज्यात एकच खळबळ
प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे पडसाद आज विधानसभेत देखील बघायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण दरेकर यांची बाजू मांडून धरली. तर सत्ताधारी पक्षाने प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मोठा गोंधळ निर्माण केला. त्यामुळे विधानसभेतील राजकीय वातावरण जरा चांगलचं तापलं दिसून आलं.
पुढचा मुख्यमंत्री काॅंग्रेसचाच असणार! नाना पटोलेंच्या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा
मागच्या निवडणुकीत मुंबै जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत मजूर आणि नागरी सहकार बॅंक अशा दोन्ही ठिकाणांहून प्रवीण दरेकर यांनी अर्ज दाखल केला होता. त्या दोन्ही निवडणुकीत प्रवीण दरेकर निवडून आले होते. मात्र निवडणुकीच्या निकाल अधिकृतपणे जाहीर होत असतानाच दरेकर यांना मजूर वर्गासाठी अपात्र घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला होता.
आता तुमचा भ्रष्टाचार काढला तर गुन्हेगार करायला निघाला का? आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल
त्यानंतर सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांची चौकशी सुरूच ठेवली होती. दरेकर यांनी ज्या मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून मुंबै बॅंकेची निवडणुक लढविली होती. त्या प्रतिज्ञा पत्रात मजूर संस्थेत ते रंगारी असल्याचे दाखवण्यात आले होते. त्यामुळे आता हा वाद न्यायालयात गेल्यास प्रवीण दरेकर कशाप्रकारे आपली बाजू मांडणार ते आता पहावे लागणार.
Read also:
- पुण्यात इच्छुकांच्या भाऊ-गर्दीचा लाखोंचा खर्च पाण्यात; प्रभाग रचना रद्द झाल्याने भावी नगरसेवक हवालदिल
- ” खासदार सुजय हा अत्यंत नम्र अन् विनयशील “; खासदार सुजय विखेंबद्दल बाळा नांदगावकरांचे आपुलकीचे बोल
- लांबे यांच्यासोबत फडणवीसांचा फोटो व्हायरल! मलिकांवर केलेल्या आरोपांबद्दल सना मलिकने फडणवीसांची हवाच काढली;
- त्यामुळेच उगाचच दाऊद दाऊद करून..; फडणवीसांनी फोडलेल्या दुसऱ्या बॉम्बवर दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया
- चक्क दाऊदची माणसं आपण वक्फ बोर्डावर नियुक्त केलीत! देवेंद्र फडणवीसांनी सादर केला दुसरा पेन ड्राईव्ह