अहमदनगर : परवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर हे अहमदनगरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी स्वर्गीय आमदार अनिलभैया राठोड यांच्या कार्यालयाला भेट दिली. माजी मंत्री. स्व. अनिल भैय्या राठोड यांची पुण्यतिथी असल्याने बाळा नांदगावकर हे नगरच्या दौऱ्यावर आले आहोत. पुण्यतिथीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर बाळा नांदगावकर यांनी विखे पाटील कुटुंबीयांची भेट घेतली.
आता तुमचा भ्रष्टाचार काढला तर गुन्हेगार करायला निघाला का? आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल
यावेळी खासदार सुजय विखे यांनी बाळा नांदगावकर यांचे आदरातिथ्य केले. खासदार सुजय विखे यांनी बाळा नांदगावकरांसोबत यावेळी मनसोक्त गप्पा मारल्या आणि आगामी काळात जिल्ह्यात काय काय कामे करणार याबद्दल संपूर्ण माहिती दिली. ही भेट झाल्यानंतर बाळा नांदगावकर यांनी सोशल मीडियावर सुजय विखे यांच्याबद्दल एक कौतुक करणारी पोस्ट शेअर केली. खासदार पदाचा कोणताही बडेजाव सुजय करत नाही असं या पोस्टमध्ये बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
इंदिरा गांधींनी माझ्या वडिलांना दोन वर्ष तुरूंगात ठेवले! आम्ही घाबरणारे नाहीत; देवेंद्र फडणवीस
यासोबतच त्यांनी विखे पाटील कुटुंबियांबद्दल देखील काही लिहले आहे. सुजय चे वडील आमदार राधाकृष्ण विखे पाटील व मी आम्ही 20 वर्षे सदनात एकत्र आमदार म्हणून तर काही वर्षे एकाच पक्षात एकाच जिल्ह्यात कार्य केले असल्याने माझा आणि त्यांचा अतिशय जवळचा असा स्नेह आहे. विखे कुटुंब म्हणजे सहकार क्षेत्रातील अतिशय आदरयुक्त घेतले जाणारे नाव. स्व. माजी मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचे माझ्यावर विशेष प्रेम होते.
पंतप्रधानांबद्दल बोललं की लगेच देशद्रोहाचा गुन्हा, मग मुख्यमंत्र्यांनावर देखील बोलू नये; उदय सामंत
अनेक वर्षे एकत्र काम करताना बाळासाहेब विखे यांची काम करण्याची व छोट्यात छोटा कार्यकर्ता जपण्याची शैली मला कायमच प्रभावित करत आली. विखे पाटील कुटुंबीयांचा सामाजिक वारसा सुजय अत्यंत भक्कमपणे पुढे नेत आहेत. नगरशहरातील जो उड्डाणपूल तयार होत आहे हे सुजय विखेंचे वाखाणण्याजोगे काम आहे असं देखील यावेळी बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
Read also:
- लांबे यांच्यासोबत फडणवीसांचा फोटो व्हायरल! मलिकांवर केलेल्या आरोपांबद्दल सना मलिकने फडणवीसांची हवाच काढली;
- त्यामुळेच उगाचच दाऊद दाऊद करून..; फडणवीसांनी फोडलेल्या दुसऱ्या बॉम्बवर दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया
- चक्क दाऊदची माणसं आपण वक्फ बोर्डावर नियुक्त केलीत! देवेंद्र फडणवीसांनी सादर केला दुसरा पेन ड्राईव्ह
- विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी फोडला दुसरा राजकीय बॉम्ब! राज्यात एकच खळबळ
- पुढचा मुख्यमंत्री काॅंग्रेसचाच असणार! नाना पटोलेंच्या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा