मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाकरे सरकार विरूद्ध राजकीय बॉम्ब टाकला. यात त्यांनी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डवर नेमणुक केलेले डॉ. मुदस्सीर लांबे यांचा संबंध दाऊदशी जो़डला. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील लांबे यांची नेमणुक सरकारने केली नसल्याचं सांगून त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. अशातच आता नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांनी ट्विटवर देवेंद्र फडणवीस आणि लांबे यांचा फोटा टाकला. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
इंदिरा गांधींनी माझ्या वडिलांना दोन वर्ष तुरूंगात ठेवले! आम्ही घाबरणारे नाहीत; देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी आज आणखी एक पेन ड्राईव्ह विधानसभेत सादर केला. त्यातील संवाद देखील फडणवीसांनी वाचून दाखविला. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. लांबे यांच्याविरोधात 31 डिसेंबर रोजी एका 33 वर्षीय सामाजिक कार्यकर्तीने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला तेव्हा लांबेने लग्न करण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर तिला गंभीर परिणाम होतील अशी धमकी दिली होती. असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
पंतप्रधानांबद्दल बोललं की लगेच देशद्रोहाचा गुन्हा, मग मुख्यमंत्र्यांनावर देखील बोलू नये; उदय सामंत
सना मलिक यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, अर्धसत्य हे पुर्ण खोटं असतं. डॉं. लांबे यांची नियुक्ती देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपच्या सरकारच्या काळात झाली आहे. महाविकास आघाडी सरकार नोव्हेंबर 2019 आलं होतं. माझ्या वडिलांकडे अल्पसंख्यांक आणि वक्फ विभाग जानेवारी 2020 मध्ये आले आहेत. देवेंद्र फडणवीस हे डी गॅंगच्या नातेवाईकांच्या आणि बलात्कारचा आरोप असणाऱ्या व्यक्तीसोबत असल्याचा दावा सना मलिक केला आहे. तसेच लांबे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीसांचा फोटो देखील सना मलिकने ट्विट केला आहे.
योगी महाराजांनी देशाचं वाटोळ केलंय, त्यांची जागा मठातच! प्रणीती शिंदे यांची सडाडून टीका
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हटलं की, वक्फ बोर्डावर नियुक्त केलेल्या लांबे यांनी आपला विस्तुत परिचय दिला आहे. त्यासंबंधीत ऑडिओ आणि व्हिडीओ पेन ड्राईव्ह मी विधानसभा उपाध्यक्षाकडे दिला आहे. यात लांबे यांचा हर्षद मोहम्मद खान यांच्याशी झालेला संवाद आहे. यामध्ये वक्ब बोर्डात कशी कमाई करायची यासंदर्भात देखील उल्लेख केला आहे. त्यातील संवाद देखील देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत वाचून दाखवला आहे. हर्षद खानला तुरूंगात टाकलं आहे. तो मोबाईल देखील त्यांच्या ताब्यात आहे. तो मोबाईल पहिल्यांदा ताब्यात घ्या. चक्क दाऊदची माणसं आपण वक्ब बोर्डात नियुक्त केलीत. अर्थसंकल्पावर बोलत असताना विकास कमी होईल जास्त होईल. एकीकडे सरकार चार गोष्टी कमी करणार जास्त करणार ते आपण पाहुन घेऊ, पंरतु या राज्यात ज्यांनी बॉम्बस्फोट घडवले अशा दाऊद संबंध ज्यांचे रिश्ते आहेत. अशा लोकांना जर सरकार पाठीशी राखत असेल तर राज्याचं कुणीचं भलं करू शकत नाही. आता तरी जागे व्हा.
Read also:
- त्यामुळेच उगाचच दाऊद दाऊद करून..; फडणवीसांनी फोडलेल्या दुसऱ्या बॉम्बवर दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया
- चक्क दाऊदची माणसं आपण वक्फ बोर्डावर नियुक्त केलीत! देवेंद्र फडणवीसांनी सादर केला दुसरा पेन ड्राईव्ह
- विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी फोडला दुसरा राजकीय बॉम्ब! राज्यात एकच खळबळ
- पुढचा मुख्यमंत्री काॅंग्रेसचाच असणार! नाना पटोलेंच्या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा
- आता तुमचा भ्रष्टाचार काढला तर गुन्हेगार करायला निघाला का? आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल