मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानात देखील देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या नोटीस बद्दल पडसाद उमटले. यावरून विधानसभेत जोरदार घोषणाबाजी देत सभागृह दणाणून गेला. देवेंद्र फडणवीसांना पाठवलेल्या नोटीस बद्दल ठाकरे सरकारवर भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपनेते आशिष शेलार यांनी जोरदार निशाणा साधला.
आशिष शेलार पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात कायद्याने कामकाज चालणार का नाही हा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषेद पत्र वाचून दाखवलं. पेन ड्राईव्हमध्ये संवेदशील माहिती होती. त्यांनी ही माहिती दिल्लीत दिली आणि राज्य सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढला. ठाकरे सरकारचे हे प्रकरण पहिलेच नाही. नॅशनल हेरॉल्ड केसमध्येही सुब्रमण्यम स्वामींनी न्यायालयाला माहिती कशी आली याबाबत सांगितले होते.
देवेंद्र फडणवीस काय कायद्यापेक्षा मोठे आहेत काय संजय राऊतांची फडणवीसांवर सडकून टीका
राफेल प्रकणात जी कागदपत्रे आणले होते ते संरक्षणाशी संबंधित होते. आम्ही ती कागद चोरलेले नसून ते सोर्सकडून घेतले आहेत हे न्यायालयानेही सांगितलं आहे. राफेल संदर्भात कागदपत्रे लीक असेल तरी सत्य तपासून पाहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आता तुमचा भ्रष्टाचार काढला तर गुन्हेगार करायला निघाला का ? असा सवाल देखील आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला केला आहे.
” अन अजित पवारांनी भाषण थांबवलं..” ; अजित दादांच्या सर्वधर्म समभावाची अख्या पुण्यात चर्चा
दरम्यान, ते या राज्यात लोकशाही मार्गाने कारभार चालणार आहे का? संविधान,सुप्रीम कोर्ट यांचे संरक्षण या राज्यातील नागरिकांना आणि विपक्ष नेत्यांना आहे की नाही? देवेंद्र फडणवीस यांची कार्यपद्धती भ्रष्टाचाराला लपवण्याची नाही, तर उघड करण्याची आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकांमध्ये काय घ़डणार ते पहाणं आता महत्वाचं आहे.
Read also:
- इंदिरा गांधींनी माझ्या वडिलांना दोन वर्ष तुरूंगात ठेवले! आम्ही घाबरणारे नाहीत; देवेंद्र फडणवीस
- पंतप्रधानांबद्दल बोललं की लगेच देशद्रोहाचा गुन्हा, मग मुख्यमंत्र्यांनावर देखील बोलू नये; उदय सामंत
- योगी महाराजांनी देशाचं वाटोळ केलंय, त्यांची जागा मठातच! प्रणीती शिंदे यांची सडाडून टीका
- नोटीस आम्हालाही येतात परंतु आम्ही तमाशा केला नाही! संजय राऊतांचा भाजपला खोचक टोला
- ” सत्य बाहेर आण्यासाठी सरकारी वकील प्रवीण चव्हाणांची नार्को टेस्ट करा”; विखे पाटलांची सरकारला मागणी