मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलीस बदल्यांच्या घोटाळ्यांवरून नोटीस पाठवण्यात आली. त्यानंतर राज्यात एका नव्या प्रकरणाला तोंड फुटलं. देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी प्रत्येक जिल्ह्यात नोटीशींची होळी करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं होतं. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
राज्यांत पोलीस बदल्यांचा महाघोटाळा! घोटाळा दाबण्याचा सरकारचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीस
संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना म्हणाले की, विजयाच्या शिल्पकाराला नोटीस येऊ नये असं कोणी म्हटंल आहे. नोटीस आम्हालाही येतात परंतु आम्ही तमाशा केला नाही. केंद्रीय तपास यंत्रणा राज्यातील नेत्यांच्या विरोधात सुडबुद्धीने वागत आहेत. त्यांना राज्यातील टार्गेट दिले असून हल्ले करण्यास सांगण्यात आलं आहे. या देशात असं कधी घडलं नव्हतं. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टार्गेट असुन बदनाम केलं जात आहे. दाऊद असला संबंध लावत आहेत. असंही ते म्हणाले.
राज्यांत पोलीस बदल्यांचा महाघोटाळा! घोटाळा दाबण्याचा सरकारचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीस
काल जे नेते पक्षात होते ते शरद पवारांना ज्या भाषेत बोलत आहेत. ते देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, आणि मोदींना मान्य आहे का ? असा सवाल देखील संजय राऊत यांनी केला. राजकीय मतभेद असु शकतात. परंतु ज्या पद्धतीची भाषा शरद पवारांसारख्या उत्तुंग नेतृत्वाविषयी वापरली जाते. आम्ही काही बोललो की शरद पवारांचे चमचे म्हटलं जातं. या महाराष्ट्राच्या लोकांचा सन्मान राहिला पाहिजे. ज्यांनी महाराष्ट्र घडवण्यासाठी योगदान दिलं. संसदीय लोकशाहीत ज्यांनी 50-50 वर्ष घालवलीत त्यांच्याविषयी कोणती भाषा भाजपचे लोक वापरत आहेत. असंही संजय राऊत म्हणाले.
राज्यांत पोलीस बदल्यांचा महाघोटाळा! घोटाळा दाबण्याचा सरकारचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीस
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण विविध कारणांमुळे बराच तापलं आहे. संजय राऊत विरूद्ध भाजप, भाजप विरूद्ध महाविकास आघाडी सरकार असा राजकीय संघर्ष बघायला मिळत आहे.
Read also:
- ” सत्य बाहेर आण्यासाठी सरकारी वकील प्रवीण चव्हाणांची नार्को टेस्ट करा”; विखे पाटलांची सरकारला मागणी
- “मुख्यमंत्री महोदय, तिचा पूजा चव्हाण होऊ देऊ नका “; रघुनाथ कुचिकवर कारवाईसाठी चित्रा वाघ यांची आर्त हाक
- देवेंद्र फडणवीस काय कायद्यापेक्षा मोठे आहेत काय संजय राऊतांची फडणवीसांवर सडकून टीका
- ” अन अजित पवारांनी भाषण थांबवलं..” ; अजित दादांच्या सर्वधर्म समभावाची अख्या पुण्यात चर्चा
- फडणवींसाना आरोपी म्हणून नोटीस पाठवली नाही; दंगा करण्याची काय गरज दिलीप वळसे पाटील