पुणे : पुण्यातील शिवसेना नेते आणि राज्यमंत्री दर्जा असणारे रघुनाथ कुचिक यांच्यावर मागील काही दिवसांमध्ये एका तरुणीने जबरदस्तीने बलात्कार आणि त्यानंतर जबरदस्तीने गर्भपात केल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण अत्यंत तापलेलं असताना सदरील मुलगी ही बेपत्ता झाली आहे आणि तिचा शोध लागत नाही. याबाबत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत मलिकांचा राजीनामा नाहीच! जयंत पाटलांनी आता स्पष्टच केलं
राज्यमंत्री दर्जा असणाऱ्या रघुनाथ कुचिक याने कशापद्धतीने तरुणीवर अत्याचार केला हे या तरुणीने सर्व काही सांगितले असताना, या संदर्भात पुरावे देऊनही पोलीस प्रशासन या नराधमाविरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्याला बेल कशा पद्धतीने मिळाली हेच मला कळत नाही असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
फडणवीसांना पोलीस ठाण्यात येण्याची आवश्यकता नाही; घरीच चौकशी करणार : मुंबई पोलीस
काल या पीडित मुलीने फेसबुकवर एक पोस्ट टाकत स्वतःला संपवून घेईल असं म्हटलं होतं. जर असं काही झालं तर याला सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन असेल आणि राज्य सरकार असेल असा इशाराही चित्रा वाघ यांनी सरकारला दिला आहे. काल या संदर्भात ती पीडित मुलगी न सापडल्याने चित्रा वाघ यांनी आवाज उठवला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी आजही ती मुलगी न सापडल्याने ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग करत मदतीचे आव्हान केले आहे. तिचा पूजा चव्हाण होऊ देऊ नका अशी आर्त हाक देखील यावेळी चित्रा वाघ यांनी दिली आहे.
महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, जोपर्यंत..; रामदास आठवले यांचं खळबळजनक वक्तव्य
मुख्यमंत्री महोदय, या राज्यमंत्री दर्जा असणाऱ्या रघुनाथ कुचिक या नराधमावर थेट ३०७ चा गुन्हा तात्काळ दाखल करा अशी मागणीही चित्रा वाघ यांनी केली आहे. आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार आणि रघुनाथ कुचिकवर कशी कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Read also:
- देवेंद्र फडणवीस काय कायद्यापेक्षा मोठे आहेत काय संजय राऊतांची फडणवीसांवर सडकून टीका
- ” अन अजित पवारांनी भाषण थांबवलं..” ; अजित दादांच्या सर्वधर्म समभावाची अख्या पुण्यात चर्चा
- फडणवींसाना आरोपी म्हणून नोटीस पाठवली नाही; दंगा करण्याची काय गरज दिलीप वळसे पाटील
- राज्यांत पोलीस बदल्यांचा महाघोटाळा! घोटाळा दाबण्याचा सरकारचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीस
- उद्या प्रत्येक जिल्ह्यात नोटिशीची होळी करणार: प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा