मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या अकरा वाजता बीकेसीमध्ये जातील त्यावेळी रिपब्लिक पक्षाचे कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत जातील, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांना दिलेली नोटीस म्हणजे महाविकास आघाडी सरकारने दिलेला नाहक त्रास आहे. ते अशा चौकशांना घाबरणारे नाहीत. असंही त्यांनी म्हटलं आहे.
बच्चू कडू सर्वांचा बाप! उद्याच मंत्रिपदाचा राजीनामा देतो; बच्चू कडू यांचं वक्तव्य
महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याच्या बातम्यांवर बोलताना म्हणाले की, राज्यातील सरकार पडणार,राष्ट्रपती राजवट लागणार या फक्त बातम्या आहेत. जोपर्यंत शिवसेना किंवा राष्ट्रवादी भाजप सोबत येणार नाही किंवा काॅंग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडत नाही तोपर्यंत सरकार टिकून राहिल. शिवसेना स्वतंत्र लढली तर दोन-चार खासदारही निवडून येणार नाहीत. त्यामुळे अडीच-वर्षाचा फॉर्म्युला शिवसेनेने मान्य करून भाजप सोबत यावे असंही आठवले यांनी सांगितलं आहे.
पवार साहेबच महाराष्ट्रात दाऊदचा माणूस! देशमुखांचा राजीनामा झटपट कसा घेतला निलेश राणेंचा सवाल
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काल सीपीआयपीने नोटीस पाठवली आहे. पोलीस बदल्यांच्या घोटाळ्या संदर्भात बीकेसी पोलिसांनी त्यांना उद्या अकरा वाजता बीकेसी पोलीस सायबर सेल याठिकाणी बोलवले आहेे. तसेच त्याठिकाणी मी जाऊन राज्य सरकारचा भांडाफोड करणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
केंद्रीय समितीचा आदेश येताच गोव्यात सरकार स्थापन करणार
महाविकास आघाडी सरकार मनमानी करताना आम्ही मात्र लोकशाही मूल्यं जपतो. हेच यातून स्पष्ट होतं आहे. मुंबईनंतर पुणे पोलिसांनीही अशीच नोटिस काढल्याचं समजंतय. अरे तुम्ही असं सत्य झाकू शकाल. पोलीस बदल्यांचा प्रकरण न्यायलयाने सीबीआयकडे सोपवल्यानंतर महाविकास आघाडी सरकार देवेंद्र फडणवीस यांना अडकवू शकत नाहीत, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
Read also:
- भिंतीवरच्या घड्याळ्यानेच काढला काटा! फडणवीसांच्या आरोपांवर वकिल प्रवीण चव्हाणांचा खुलासा
- फडणवीसांना चौकशी दरम्यान नाहक त्रास दिला तर याद राखा! फडणवीसांना नोटीस आल्यानंतर पाटलांची प्रतिक्रिया
- त्यांनी या वयात अशी हास्यास्पद विधानं करू नये; कुमार केतकरांच्या वक्तव्याला फडणवीसांचं प्रत्युत्तर
- घोटाळेबाजांना उघड करण्याचा किरीट सोमय्याचा गुन्हा करत असेल, तर एक हजार वेळा करणार
- सरकारने घोटाळा दाबण्याकरता गुन्हा दाखल केला; उद्या बीकेसीच्या सायबर सेलमध्ये हजर राहणार : फडणवीस