मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खळबळजनक वक्तव्य केले होते. त्यात त्यांनी विरोधकांना संपवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप करत त्यासंबंधी 125 तासांचा रेकॉर्डिंग असल्याचे म्हटले होते.
त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. तसेच रश्मी शुक्ला फोन टँफिंग प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अर्थसंकल्प 2022! पुणे जिल्ह्यांसाठी अजित दादांनी दिलं भरभरून निधी
देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईत 12 मार्च रोजी झालेल्या 1993 च्या बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी झालेल्या नागरिकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच त्या बॉम्बस्फोटातील दहशतवाद्यांशी संबंधित नेता आज मंत्रिमंडळात आहे त्याची मी खंत व्यक्त करतो, असंही ते म्हणाले.
सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
तसेच ते पुढे म्हणाले की, मार्चमध्येच मी एक वर्षापूर्वी पोलीस बदल्यांचा घोटाळा बाहेर काढला होता. यांसंबंधी मी सगळी माहिती गृहमंत्रालयाला दिली होती. तसेच यासंबंधी प्रकरणाचा गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने हा प्रकरण सीबीआयकडे देण्यात आला. अनिल देशमुख यांची देखील यांसबंधी चौकशी सुरू आहे. हा घोटाळा दाबण्यासाठी राज्य सरकारने गुन्हा दाखल केला होता. यासंबंधी मला सीआरपीसीची पोलिसांकडून नोटीस पाठवून बीकेसीच्या सायबर सेलमध्ये बोलवलं आहे.
फक्त तोंडाला पान पुसण्याचं काम सरकारने केलंय! 2022 च्या अर्थसंकल्पावर फडणवीसांची प्रतिक्रिया
तसेच मी राज्याचे विरोधी पक्षनेते असल्याने मला विशेष अधिकार आहे. यासंबंधी मी सगळी माहिती गृहमंत्रालयाने देऊन कुठलाही माहिती बाहेर येऊ दिली नाही. मी राज्याचा गृहमंत्री देखील राहिलो आहे. पोलिसांनी माझं या प्रकरणाबाबत सहाय्य मागितलं आहे ते मी देणार आहे. असंही ते म्हणाले.
Read also:
- बच्चू कडू सर्वांचा बाप! उद्याच मंत्रिपदाचा राजीनामा देतो; बच्चू कडू यांचं वक्तव्य
- पवार साहेबच महाराष्ट्रात दाऊदचा माणूस! देशमुखांचा राजीनामा झटपट कसा घेतला निलेश राणेंचा सवाल
- केंद्रीय समितीचा आदेश येताच गोव्यात सरकार स्थापन करणार
- ..तर तुम्ही मुंबईलाही केंद्रशासीत प्रदेश केलं असतं; युपी निकालांवरून रोहित पवारांचा भाजपला टोला
- उधारीचा वायदा करणार अन् जबाबदारी टाळणारा राज्याचा अर्थसंकल्प