पुणे : पाचही राज्याच्या निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले आहेत. पंजाब सोडलं तर भारतीय जनता पक्षाने इतर चारही राज्यांमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. दुसरीकडं पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने एकहाती विजय मिळवत ९२ जागांवर विजय मिळवून विरोधी पक्ष नेस्तनाबूत केले आहेत. आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांचा थेट पराभव या ठिकाणी झालेला पाहायला मिळत आहे.
अर्थसंकल्प 2022! एसटी आंदोलनावर यंदाच्या अर्थसंकल्पात तात्पुरती मलमपट्टी; वाचा
निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकारला धक्के बसणार असं बोललं जातं असताना आता आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. युपी, उत्तराखंड, गोव्यातभाजपला सत्ता मिळाली आहे हे मान्य आहे, मात्र महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना खुश होण्याचे कारण काय ? असा प्रश्न रोहित पवारांनी केला आहे.
अर्थसंकल्प 2022! एसटी आंदोलनावर यंदाच्या अर्थसंकल्पात तात्पुरती मलमपट्टी; वाचा
भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध असलं पाहिजे. तुम्ही जेव्हा महाराष्ट्रात सत्तेत होता तेव्हा महाराष्ट्राची ताकद कमी करायचे पाप तुम्ही केले आहे. तेव्हा तुम्हाला महाराष्ट्राच्या अस्मितेचं काही पडलं नव्हतं असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी जे सेंटर महत्वाचं होतं, ज्यातून शिक्षित युवा वर्गाला लाखांपेक्षा जास्त नोकऱ्या मिळाल्या असत्या, त्या तुमच्या काळात तुम्ही ते सर्व गुजरातला नेलं. डायमंड ट्रेड, शिपबिल्डींग, विविध व्यवसाय जे महाराष्ट्रात सुरु होते किंवा काही यायचे होते ते तुम्ही गुजरातला नेले.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची अवस्था काॅंग्रेससारखी होईल, त्यांनी भाजपसोबत यावे रामदास आठवले
मरीन पोलीस सेंटर जे पालघरला होणार होतं तेही तुम्ही गुजरातला पळवून नेलं. छत्रपत्री शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांबद्दल देखील तुम्ही कधी चकार शब्द काढला नाही. तुम्ही नेहमी तुमचं राजकीय हित जपण्याचा प्रयत्न केला. जर भाजपची मागच्या वेळी महाराष्ट्रात सत्ता आली असती तर तुम्ही मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश करून टाकलं असा सणसणीत टोला रोहित पवार यांनी युपीच्या निकालावरून भाजपला लावला आहे.
Read also:
- उधारीचा वायदा करणार अन् जबाबदारी टाळणारा राज्याचा अर्थसंकल्प
- अर्थसंकल्प 2022! पुणे जिल्ह्यांसाठी अजित दादांनी दिलं भरभरून निधी
- सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- फक्त तोंडाला पान पुसण्याचं काम सरकारने केलंय! 2022 च्या अर्थसंकल्पावर फडणवीसांची प्रतिक्रिया
- अजित दादांचं मराठी प्रेम! यंदाच्या अर्थसंकल्पात मराठी भाषा भवनासाठी 100 कोटींची तरतुद