पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत राज्याचा 2022-23 साठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात यावेळी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प असा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. पुणे जिल्ह्यांच्या विकासासाठी अजित पवार यांनी भरभरून निधीची तरतुद केली आहे.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची अवस्था काॅंग्रेससारखी होईल, त्यांनी भाजपसोबत यावे रामदास आठवले
पुणे जिल्हातील लोणावळा येथील पर्यटकांसाठी टायगर पॉईंटवर तसेच त्याठिकाणी स्काय वॉकसह इतर सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुणे आणि वन विभागात 90 हेक्टरवर बिबट्या सफारीसाठी प्रकल्प प्रास्तवित असून त्यासाठी 60 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे अर्थसंकल्पात नमुद करण्यात आलं आहे. क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांचा पुण्यातील गंजपेठ येथे फुले वाड्यास संरक्षित राज्य वारसा स्थळ असलेल्या स्मारकाच्या विस्तारीकरण विकासासाठी 100 कोटींची तरतुद करण्यात आली आहे. त्याचबरोबर मावळ तालुक्यातील श्रींसत जगनाडे महाराजांचे समाधीस्थल असेललं संदुबरे या क्षेत्राला पर्यटनाचा दर्जा या सर्व क्षेत्राच्या विकासाठी 10 कोटींची तरतुद करण्यात आली आहे.
भाजपची कोणतीही लाट किंवा वादळ नाही! अमोल मिटकरींची भाजपवर खरमरीत टीका
पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मुळ गावातील शाळेचा विकास, तसेच सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव असलेल्या नायगाव या शाळेच्या विकासासाठी 1 कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभ स्मारकाचा विकास करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुणे-पुरंदर रिंगरोड प्रकल्पासाठी 1 हजार 900 हेक्टर जमीनींचे संपादन केले जाणार आहे. त्यासाठी 1 हजार 500 कोटींचा निधी प्रस्तावित आहे.
महाराष्ट्रातील सत्तांतर अटळ, महाराष्ट्रात पर्यायी सरकार देऊ : देवेंद्र फडणवीस
पुण्यातील मेट्रो प्रकल्प स्वारगेट ते पिंपरी चिंचवड, वनाढ ते रामवाडी या मार्गिका पुर्ण करण्यासाठी अंतिम टप्प्यावर आहे. पुणे ते महानगर प्राधिकरणाने हिंजवडीतील राजीव गांधी आयटीपार्कपासून शिवाजीनगरला जोडणाऱ्या मेट्रो प्रकल्प लाईन-3 या प्रकल्पाचे काम सुरू केलं आहे. याची लांबी 23 किमी असून त्याची अंदाजी किंमत 8 हजार 313 कोटी आहे.
Read also:
- सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- फक्त तोंडाला पान पुसण्याचं काम सरकारने केलंय! 2022 च्या अर्थसंकल्पावर फडणवीसांची प्रतिक्रिया
- अजित दादांचं मराठी प्रेम! यंदाच्या अर्थसंकल्पात मराठी भाषा भवनासाठी 100 कोटींची तरतुद
- अर्थसंकल्प 2022! एसटी आंदोलनावर यंदाच्या अर्थसंकल्पात तात्पुरती मलमपट्टी; वाचा
- महिला, शेतकरी, शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून राबवण्यात येणार! वाचा यंदाचा अर्थसंकल्प