मुंबई : पाच राज्यांपैकी चार राज्यात भाजपने एकहाती सत्ता मिळवण्यानंतर आता महाराष्ट्रात देखील राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शिवसेनासह अन्य दोन पक्षांसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी चाचपाणी करताना दिसत आहेत. त्यामुळे आगामी काही काळात राज्यात वेगाने राजकीय घडामोडी घडण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
गोव्यातील विजयाबद्दल फडणवीसांनी सांगितली दोन नावं! गोव्यात सत्ता स्थापन करण्याचा दावा
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत घवघवतीत यश मिळवण्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईमध्ये जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की. महाराष्ट्रातील सत्तांतर हे अटळ आहे. आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पुर्णपणे भाजपची सत्ता स्थापन होणार आहे. तसेच महाराष्ट्रात भाजप पर्यायी सरकार देखील देऊ शकेल, असंही वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
महाराष्ट्र अभी बाकी है म्हणताय महाराष्ट्र तैयार है: शरद पवार यांचे भाजपला प्रतिआव्हान
ते पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेश, मणिपुर, गोवा आणि उत्तराखंड या निवडणुकांमधून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, सामान्य माणसाच्या मनावर अजूनही नरेंद्र मोदी यांची जादू कायम आहे. उत्तर प्रदेश आणि गोव्यात मोदींच्या प्रभावामुळेच अॅंटी- इन्कम्बन्सीचे रूपांतर प्रो-इन्कम्बन्सीमध्ये झाले आहे. मोदींच्या नेतृत्वामुळेच भाजपला मोठा विजय मिळवता आला.
महाराष्ट्र अभी बाकी है म्हणताय महाराष्ट्र तैयार है: शरद पवार यांचे भाजपला प्रतिआव्हान
राज्यसभेचे काॅंग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी देखील महाविकास आघाडी सरकारबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर एका चर्चासत्रात त्यांनी महाराष्ट्रातील सरकार लवकरच पडणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांच्या पाठीमागे इडीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
Read also:
- महाराष्ट्रातील सरकार लवकरच पडणार! काॅंग्रेस खासदार कुमार केतकर यांचं वक्तव्य
- आता पुढचं टार्गेट महानगरपालिका! विधानसभा निवडणुका निकालानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
- विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसचा सुपडा साप! राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया
- मोदी-योगींच्या ‘व्हीजन ऑफ डेव्हलपमेंट’ला देशवासीयांची साथ : आमदार महेश लांडगे
- उन्हें पराजित कौन करेगा, जिसके रक्षक राम हैं! उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी