मुंबई : राज्यात आगामी काही काळात ठाणे, पुणे, मुंबई आणि नाशिक या महत्वाच्या शहरांमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. देशातील या विधानसभांच्या निवडणुकांनंतर आता आमचं पुढील टार्गेट हे महानगरपालिका असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. तसेच या सर्व निवडणुकांचे सगळे श्रेय हे पक्ष अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जातंय, असंही यावेळी ते म्हणाले.
महाराष्ट्र अभी बाकी है म्हणताय महाराष्ट्र तैयार है: शरद पवार यांचे भाजपला प्रतिआव्हान
राज्यात होत असलेल्या आगामी महापालिका निवडणुकीसाठी शुभेच्छा देतोय. राज्यातील महानगरपालिका काहीही करून भाजपच्या ताब्यात आली पाहिजे. पोपटाचा प्राण हा त्या महानगरपालिकेत अडकलेला आहे. आता सगळे वाभाडे निघालेत. आठवडाभरत धाडी चालल्या त्यातुन स्पष्ट होईल की विकास किती केला आणि घरी किती पैसे नेले. त्यामुळे आता महापालिका हेच सर्वाचं टार्गेट असलं पाहिजे, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
लोकांचा आवाज हा देवांचा आवाज, आपचे अभिनंदन! नवज्योत सिंग सिद्धू यांचे ट्विट
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकां भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या. देशातील अनेकांना वाटतं की मोदींचा करिश्मा संपला. परंतु त्यांना अजून जमिनीवरील वास्तव माहिती नाही. ज्या प्रकारे मोदी आमि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी सर्वसामान्यांच्या गरजा पुर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्याचाच हे यश आहे. अनेक प्रकारच्या वावड्या उठल्या एक विशिष्ट समुदाय भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र येणार आहे. मग हा गेला तो गेला. काही उत्तर प्रदेशात फरक पडला नाही. याचं कारण पुरषांनी तर भाजपला मतदान केलंच असेल. असंही त्यांनी म्हटलं आहे.
अकेला देवेंद्र क्या करेगा पुछनेवालों को करारा जवाब! चित्रा वाघ यांनी शिवसेनेला डिवचलं
तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशमध्ये महिला सुरक्षित झाल्याने त्यांच्याविषयी महिलांच्या मनात प्रचंड आदर आहे. विविध योजनेच्या माध्यमातून महिलांच्या मूलभूत समस्या सोडवल्यामुळे महिलांनी मोठ्या प्रमाणात भाजपवर विश्वास दाखवत मतदान केले, असंही ते म्हणाले.
Read also:
- विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसचा सुपडा साप! राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया
- मोदी-योगींच्या ‘व्हीजन ऑफ डेव्हलपमेंट’ला देशवासीयांची साथ : आमदार महेश लांडगे
- उन्हें पराजित कौन करेगा, जिसके रक्षक राम हैं! उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी
- गोव्यातील विजयाबद्दल फडणवीसांनी सांगितली दोन नावं! गोव्यात सत्ता स्थापन करण्याचा दावा
- केजरीवालांचा आता बहुतेक शिवसेना भवनात जंगी सत्कार! अति विराट सभा, झंझावती दौरा