मुंबई : देशातील 5 विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागण्याची शक्यता आहे. उत्तरप्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि गोव्यात भाजप पक्ष आघाडीवर असून एकमात्र पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांचा बोलबाला सुरू आहे. त्यामुळे सत्ताधारी काॅंग्रेसला मोठा धक्का बसला असून थोड्यात वेळात मुख्यमंत्री चरणजीत चन्नी हे पदाचा राजीनामा देणार आहेत. तर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेेचे आभार मानले आहेत.
सुरूवातीला प्राथमिक निवडणुकीचा कल हा सर्व भाजपच्या हाती लागला आहे. पंरतु भाजपला पंजाबमध्ये आघाडी घेता आली नाही. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्ता स्थापन करेल, असं एग्झिट पोल म्हटलं होतं. तसंच काहीसं चित्र पंजाबमध्ये होताना दिसत आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांना 59 जागांचा बहुमताचा आकडा आहे. त्यामुळे आम आदमी पक्षांनी हा बहुमताचा आकडा पार करून तब्बल 81 जागांवर आघाडी घेतली आहे.
नाटकातील सरपंच, मंजुळाबाई, गोप्या, मास्तर कोण? अंक अजून बाकी! शेलारांचा सरकारला इशारा
पंजाब काॅंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, लोकांचा आवाज हा थेट देवाचा आवाज असतो. पंजाबच्या लोकांनी दिलेला कौल मी नम्रपणे स्वीकार करतो. तसेच त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचं अभिनंदन देखील केलं आहे.
महाविकास आघाडी सरकारवर शरद पवार नागासारखे बसलेत! नितेश राणेंची जहरी टीका
गेल्या एक वर्षापासून पंजाब काॅंग्रेसमध्ये अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी अचानक मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. यात नवज्योत सिंग सिद्धू यांची महत्वाची भूमिका होती. त्यानंतर पंजाब काॅंग्रेसने चरणजीत चन्नी यांची निवड मुख्यमंत्री म्हणून केली होती. पंरतु या विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसचे हे महत्वाचे नेते पिछाडीवर आहेत.
Read also:
- आमदार महेश लांडगे यांनी गोव्याचे मैदान मारले; जोशुआ डिसोझा यांचा दमदार विजय!
- अकेला देवेंद्र क्या करेगा पुछनेवालों को करारा जवाब! चित्रा वाघ यांनी शिवसेनेला डिवचलं
- गोवा निवडणूक: म्हापशातून भाजपच्या जोशुआ डिसुझा यांची निर्णायक विजयाकडे वाटचाल
- सगळीकडे खिचडी होऊ शकते; परंतु गोव्यात नाही! संजय राऊत यांचं भाकित
- आमचं राजकारण नकलांवर उभं नाही; संजय राऊतांचा राज ठाकरे यांना प्रत्युत्तर