मुंबई : मनसेच्या 16 व्या वर्धापन दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी राज्यपालांनी शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले आणि महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. तसेच त्यांनी संजय राऊत यांची देखील नक्कल केली. यावरून आता संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शातं बसणार नाहीत! फडणवीसांचा हल्लाबोल
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, नक्कल ही मोठ्या माणसांची केली जाते. त्यामुळे नक्कल ही केलेली चांगली आहे. तुम्ही बोला, बोललं पाहिजे, सगळ्यांनी बोललं पाहिजे परिस्थिती झाली आहे. इडीने आम्हाला बोलावलं म्हणून गप्प बसलो नाही. आम्ही बोलत राहु आम्हाला कुणाची भीती नाही. ही बाळासाहेब यांची शिवसेना आहे. जे सत्य आहे. त्यावर शिवसेना डुप्लिकेट काही नाही. जे सत्य आहे ते शिवसैनिक बोलणार. आमचं राजकारण नकलांवर उभं नाही. आमचं राजकारण हे स्वाभिमान, कामावर आणि संघर्षावर उभं आहे.
नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा मोर्चो ! फडणवींसासह अनेक भाजप नेते आझाद मैदानावर
तसेच पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालांबद्दल वरून नक्कीच परिवर्तन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर विरोधी पक्षांकडून टीका होत असताना त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, काही लोक आजारी नसताना ही सक्रीय नसतात. मुख्यमंत्र्या इतक कुणीच सक्रीय नाही. म्हणून तर राज्य पुढं चालतंय असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला.
गिरीश महाजन यांना उच्च न्यायालयाने फटकारलं ! 10 लाख रूपये देखील जप्त करण्याचे दिले आदेश
राज्यात आगामी महिन्यांत महानगरपालकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या महत्वाच्या शहरांत मोठी चुरस बघायला मिळणार आहे. तसेच काही दिवसांपासून राज्यातील राजकारण विविध मुद्यांवरून चांगलचं तापलं आहे. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष बाजी मारतो, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- महाविकास आघाडीतील काही उपटसुंभ नेत्यांमुळे कामगारांची फसगत! एसटी संपावर प्रकाश आंबेकरांची प्रतिक्रिया
- नाटकातील सरपंच, मंजुळाबाई, गोप्या, मास्तर कोण? अंक अजून बाकी! शेलारांचा सरकारला इशारा
- महाविकास आघाडी सरकारवर शरद पवार नागासारखे बसलेत! नितेश राणेंची जहरी टीका
- राज्यभर आम्ही लढा उभारू अन् तुमचं जगणं मुश्किल करून टाकू! चंद्रकांत पाटलांचा इशारा
- अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात भाजप माहीर! फडणवीसांच्या राजकीय बॉम्बवर रोहित पवारांची प्रतिक्रिया