पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून येत आहे. काल विधानसभेत राज्याचे विरोधी पक्षनेते राजकीय बॉम्ब फोडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांना संपवण्यासाठीचा कट रचत असल्याचा पुरावा पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभा उपाध्यक्षांकडे दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
गोव्याच्या रश्मी शुक्ला कोण? संजय राऊतांनी केंद्रीय यंत्रणांचे काढले वाभाडे
विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी उपाध्यक्षांकडे सोपविलेला पेन ड्राईव्ह लगेच माध्यमांकडे आला. त्यामुळे या घटनेवरून कुठंतरी राजकारण केलं जात असल्याची शंका आमच्या मनात आली. जोपर्यंत तो व्हिडीओ खरा खोटा ठरत नाही. तोपर्यंत कुठल्याही प्रकारे निरिक्षणांपर्यंत न येणं हे माझ्यासोबत इतर लोकांना देखील वाटत आहे. तंत्रज्ञानाचा कसा वापर केला जात आहे, याचा उदाहरण देत त्यांना पॅगेसेस या तंत्रज्ञानाचा उल्लेख केला. त्याचा वापर करून आपल्या हातातील मोबाईल चालू अथवा बंद करू शकतो. हे तंत्रज्ञान इतर देशांत आहेत, पंरतु भारतात देखील असल्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते, तेच निवडणूक काळात गोव्यात; फोन टँपिंगवरून संजय राऊतांचा टोला
एआय व्हिडीओ टुल च्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचा लिपच्या आधारे दुसऱ्या व्यक्तीचा चेहरा ,ऑडिओ घेतला जातो. याचा वापर याठिकाणी झाला आहे, याबद्दल मला माहिती नाही. पंरतु याचा गैरवापर कुणीही करू शकतो. तसेच पॅगसेस प्रकरण होऊ शकतो, एआय व्हिडीओ टुलच्या माध्यमातून काहीही होऊ शकतं. हे तपासून बाहेर येईल. असंही त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते, तेच निवडणूक काळात गोव्यात; फोन टँपिंगवरून संजय राऊतांचा टोला
दरम्यान, या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात भाजप माहिर असल्याचं सांगून त्यांनी उत्तर प्रदेशमधील उदाहरण दिलं. त्यामुळे हे सर्व प्रकरण तपासातून पुढे येईलच, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण चांगलचं पेटलेलं दिसून येत आहे.
Read also:
- नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शातं बसणार नाहीत! फडणवीसांचा हल्लाबोल
- नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा मोर्चो ! फडणवींसासह अनेक भाजप नेते आझाद मैदानावर
- गिरीश महाजन यांना उच्च न्यायालयाने फटकारलं ! 10 लाख रूपये देखील जप्त करण्याचे दिले आदेश
- व्हिडीओ क्लिपमध्ये ते मोठे साहेब कोण? शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण
- फोन टँपिंग प्रकरणावर उपमुख्यमंत्र्याचं संजय राऊतांना प्रत्युत्तर, म्हणाले…