मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजप विरूद्ध महाविकास आघाडी संघर्ष बघायला मिळत आहे. आज आझाद मैदानावर भाजपने राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी मोर्चा काढला होता. यावेळी भाजपच्या नेत्यांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली आहे. अशातच या मोर्चोत भाजपचे नेते नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागाची उपमा दिली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे.
व्हिडीओ क्लिपमध्ये ते मोठे साहेब कोण? शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण
आपण याठिकाणी कशासाठी आंदोलन करण्यासाठी आलो आहे. हे भाजपच्या कार्यकर्यत्यांनी समजून घेतलं पाहिजे. उगाचच याठिकाणी गर्दी करायला कुणालाही बोलवलं नाही आहे. आपल्याला विधानसभेत बसलेले महाविकास आघाडीचे सगळे मंत्री, आणि घरातून न निघालेले मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीवर नागासारखे बसलेले शरद पवार यांच्यापर्यंत संदेश पोहोचवायाचा आहे. तुम्ही आमच्या मुंबईकडे वाकड्या नजरेेने पहाल, तर भाजपचे कार्यकर्ते तुम्हाला फिरू देणार नाहीत. हा संदेश देण्यासाठी हा मोर्चा काढला असल्याचं नितेश राणेंनी म्हटलं आहे.
फोन टँपिंग प्रकरणावर उपमुख्यमंत्र्याचं संजय राऊतांना प्रत्युत्तर, म्हणाले…
नवाब मलिक यांचा आम्ही राजीनामा का मागतोय, त्यांनी काही साधुसंताचा काम केलं नाही. त्यांनी आपल्या मुंबईवर बॉम्बस्फोट करणाऱ्या दाऊद इब्राहिमबरोबर जमीनाचा व्यवहार केला. त्यांनी भारतीय जनतेचा विश्वातघात केला म्हणून त्यांचा आम्ही राजीनामा मागतोय. ते कदाचित तुरूंगात बसून आपला मोर्चा पाहत असेल. तुम्ही कितीही मोर्चा काढा, पंरतु मुख्यमंत्री माझा कधीही राजीनामा घेणार नाहीत, असा विचार ते करीत असतील. मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारायचं आहे की, तुम्ही आमदार, मंत्री नंतर आहात, पाहिलं तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहात, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. असंही नितेश राणे यांनी म्हटलंय.
गोव्याच्या रश्मी शुक्ला कोण? संजय राऊतांनी केंद्रीय यंत्रणांचे काढले वाभाडे
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावळकुळे आदी भाजपचे नेते आझाद मैदानावर उपस्थित होते. त्यामुळे नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून आगामी काळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
Read also:
- राज्यभर आम्ही लढा उभारू अन् तुमचं जगणं मुश्किल करून टाकू! चंद्रकांत पाटलांचा इशारा
- अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात भाजप माहीर! फडणवीसांच्या राजकीय बॉम्बवर रोहित पवारांची प्रतिक्रिया
- नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शातं बसणार नाहीत! फडणवीसांचा हल्लाबोल
- नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा मोर्चो ! फडणवींसासह अनेक भाजप नेते आझाद मैदानावर
- गिरीश महाजन यांना उच्च न्यायालयाने फटकारलं ! 10 लाख रूपये देखील जप्त करण्याचे दिले आदेश