पुणे : गोवा विधानसभा निवडणुकीत म्हापसा विधानसभा मतदार संघातून भाजपाचे अधिकृत उमेदवार जोशुआ डिसोझा यांनी दमदार विजय मिळवला. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्याकडे म्हापसा मतदार संघ निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे राजकीय पटलावरील पैलवान अशी ओळख असलेल्या आमदार लांडगे गोव्याचे मैदान मारले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
नाटकातील सरपंच, मंजुळाबाई, गोप्या, मास्तर कोण? अंक अजून बाकी! शेलारांचा सरकारला इशारा
देशातील ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून, ३ राज्यांमध्ये भाजपाने आघाडी कायम ठेवली आहे. गोव्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष झाला आहे. भाजपा सध्या १७ जागांवर आघाडीवर आहे. गोव्यात सर्वात जास्त चर्चेत असणारी जागा म्हणजे म्हापसा विधानसभा मतदारसंघाची. या मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे दिवंगत नेते फ्रान्सिस डिसुझा यांचे पुत्र जोशुआ डिसुझा हे निवडणूक लढवत होते.
महाविकास आघाडी सरकारवर शरद पवार नागासारखे बसलेत! नितेश राणेंची जहरी टीका
आता या जागेवरून जोशुआ निर्णायक आघाडी घेताना दिसत आहेत. आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये जोशुआ १७२५ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात भाजपमधून काँग्रेसवासी झालेले सुधीर कांदोळकर हे निवडणूक लढवत होते. तर, जोशुआ यांनी घेतलेली ही आघाडी पाहता हे कल आता शेवटपर्यंत राहून जोशुआ डिसुझा विजय निश्चित मानला जात आहे.
राज्यभर आम्ही लढा उभारू अन् तुमचं जगणं मुश्किल करून टाकू! चंद्रकांत पाटलांचा इशारा
दरम्यान, २०१९ साली फ्रान्सिस डिसुझा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत देखील जोशुआ यांनी बाजी मारली होती. जोशुआ डिसुझा विरुद्ध सर्वपक्षीय नेते एकवटले होते. जोशुआ हे अत्यंत तरुण असे नेते आहेत. जोशुआ यांचे वय अवघे ३३ वर्षे आहे. विशेष म्हणजे, भाजपातून बंडखोरी केलेले मंत्री मायकेल लोबो यांनी या मतदार संघात विशेष लक्ष घातले होते. यापार्श्वभूमीवर गोवा भाजपा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी म्हापसा मतदार संघाची जबाबदारी आमदार लांडगे यांच्यावर सोपवली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढाईत जोशुआ यांनी बाजी मारली.
Read also:
- अकेला देवेंद्र क्या करेगा पुछनेवालों को करारा जवाब! चित्रा वाघ यांनी शिवसेनेला डिवचलं
- गोवा निवडणूक: म्हापशातून भाजपच्या जोशुआ डिसुझा यांची निर्णायक विजयाकडे वाटचाल
- सगळीकडे खिचडी होऊ शकते; परंतु गोव्यात नाही! संजय राऊत यांचं भाकित
- आमचं राजकारण नकलांवर उभं नाही; संजय राऊतांचा राज ठाकरे यांना प्रत्युत्तर
- महाविकास आघाडीतील काही उपटसुंभ नेत्यांमुळे कामगारांची फसगत! एसटी संपावर प्रकाश आंबेकरांची प्रतिक्रिया