पणजी : देशातील 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून, 3 राज्यांमध्ये भाजपने आघाडी कायम ठेवली आहे. गोव्यात भाजप सर्वात मोठा पक्ष झाला आहे. भाजप सध्या 17 जागांवर आघाडीवर आहे. गोव्यात सर्वात जास्त चर्चेत असणारी जागा म्हणजे म्हापसा विधानसभा मतदारसंघाची. या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिवंगत नेते फ्रान्सिस डिसुझा यांचे पुत्र जोशुआ डिसुआ हे निवडणुक लढवत होते.
राज्यभर आम्ही लढा उभारू अन् तुमचं जगणं मुश्किल करून टाकू! चंद्रकांत पाटलांचा इशारा
आता या जागेवरून जोशुआ निर्णायक आघाडी घेताना दिसत आहेत. आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये जोशुआ 1725 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात भाजपमधून काॅंग्रेसवासी झालेले सुधीर कांदोळकर हे निवडणूक लढवत होते. तर जोशुआ यांनी घेतलेली ही आघाडी पाहता हे कल आता शेवटपर्यंत राहून जोशुआ डिसुआ विजयाच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत.
अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात भाजप माहीर! फडणवीसांच्या राजकीय बॉम्बवर रोहित पवारांची प्रतिक्रिया
दरम्यान, 2019 साली फ्रान्सिस डिसु्आ यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत देखील जोशुआ यांनी बाजी मारली होती. जोशुआ डिसुआ विरूद्ध सर्वपक्षीय नेते एकवटले होेते. जोशुआ हे अत्यंत तरूण नेते आहेत. जोशुआ यांचे वय अवघे 33 वर्षे आहे.
नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शातं बसणार नाहीत! फडणवीसांचा हल्लाबोल
उत्तराखंड, मणिपूर, पंजाब, उत्तरप्रदेश आणि गोवा या राज्यांत सध्या विधानसभा निवडणुकांसाठी मतमोजणी सुरू आहे. अनेक ठिकाणी भाजपने आघाडी घेतली असून गोव्यात चांगलीच चुरस बघायला मिळत आहे. आज सायंकाळ पर्यंत निवडणुकांचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात दिसत असतानाचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.
Read also:
- सगळीकडे खिचडी होऊ शकते; परंतु गोव्यात नाही! संजय राऊत यांचं भाकित
- आमचं राजकारण नकलांवर उभं नाही; संजय राऊतांचा राज ठाकरे यांना प्रत्युत्तर
- महाविकास आघाडीतील काही उपटसुंभ नेत्यांमुळे कामगारांची फसगत! एसटी संपावर प्रकाश आंबेकरांची प्रतिक्रिया
- नाटकातील सरपंच, मंजुळाबाई, गोप्या, मास्तर कोण? अंक अजून बाकी! शेलारांचा सरकारला इशारा
- महाविकास आघाडी सरकारवर शरद पवार नागासारखे बसलेत! नितेश राणेंची जहरी टीका