मुंबई : देशातील पाच विधानसभा निवडणुकांचा कल जाहीर झाला आहे. उत्तर प्रदेश, मणिपुर, गोवा आणि उत्तराखंडमध्ये भाजप बहुमत मिळण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये काॅंग्रेसला जोरदार धक्का देत अरविंद केजरीवाल यांच्या आम आमदी पक्षांनी मोठी मुंसडी मारली आहे. तर गोवा आणि उत्तर प्रदेश शिवसेनेला खातं ही उघडता आलं नाही. यावरून भाजप नेते आशिष शेेलार यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.
सगळीकडे खिचडी होऊ शकते; परंतु गोव्यात नाही! संजय राऊत यांचं भाकित
गोव्यात आणि उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवार उभे केले होते. पंरतु शिवसेनेच्या एकाही उमेदवाला आघाडी घेता आली नाही. यावरून आशिष शेलार म्हणाले की, अरविंद केजरीवालांचा आता बहुतेक शिवसेना भवनात जंगी सत्कार होईल, शिवाजी पार्कमध्ये हत्तीवरून युवराज साखर सुद्धा वाटतील. शेजाऱ्यांच्या घरात पाळणा हलला की पुढे वाटपाचे कार्यक्रम करून दाखवले जातात. आपले नाही धड अन् शेजाऱ्याचा कढ असा खोचक टोला आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे.
तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, इसवीसन 2024 साली दिल्लीच्या खुर्चीत बसणार. उत्तर प्रदेश, गोव्यात बघा आम्ही करून दाखवतो. उत्तर प्रदेशात युवराजांची अति विराट सभा. झंझावती दौरा. सगळ्या बुडबु़ड्यांचे निकाल लागले. अती प्रचंड मतांनी झंझावाती डिपॉझिट गुल हारले. एक मासो आणि खंडी भर रस्सो. असं देखील म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
उत्तर प्रदेश पाठोपाठ मणिपुर, गोवा, उत्तराखंड या राज्यांत भाजपने आघाडी घेतल्यानंतर आता महाराष्ट्रात सत्ता येईल. असा आशावाद भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Read also:
- महाराष्ट्र अभी बाकी है म्हणताय महाराष्ट्र तैयार है: शरद पवार यांचे भाजपला प्रतिआव्हान
- लोकांचा आवाज हा देवांचा आवाज, आपचे अभिनंदन! नवज्योत सिंग सिद्धू यांचे ट्विट
- आमदार महेश लांडगे यांनी गोव्याचे मैदान मारले; जोशुआ डिसोझा यांचा दमदार विजय!
- अकेला देवेंद्र क्या करेगा पुछनेवालों को करारा जवाब! चित्रा वाघ यांनी शिवसेनेला डिवचलं
- गोवा निवडणूक: म्हापशातून भाजपच्या जोशुआ डिसुझा यांची निर्णायक विजयाकडे वाटचाल