अमरावती : राज्याचा 2022-23 साठीचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रा दिसत नसल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. अशातच आता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले असून राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे गेल्या आठ दिवसांपासून शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. मागील आठवड्यापासून राज्यात जोरदार पाऊस पडत असल्याने या शेतकऱ्यांनी भरपावसात देखील उपोषण सुरूच ठेवलं आहे. यावेळी भरपावसात बच्चु कडू यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. त्यावेळी शेतकऱ्यांना बच्चु कडू म्हणाले की, तुम्ही याठिकाणी माझ्या राजीनाम्यासाठी बसले आहेत की, न्यायासाठी? हे बरोबर नाही. मात्र तुमची इच्छा असेल तर मी उद्याच मंत्रिपदाचा राजीनामा देतो. असं वक्तव्य त्यांनी केले आहे.
फक्त तोंडाला पान पुसण्याचं काम सरकारने केलंय! 2022 च्या अर्थसंकल्पावर फडणवीसांची प्रतिक्रिया
बच्चु कडू पुढे म्हणाले की, मला मंत्रिपदाची पर्वा नाही. तुमची इच्छा असेल तर मी उद्याच पदाचा राजीनामा देतो. बच्चू कडू सर्वांचा बाप आहे. त्याचबरोबर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी 16 मार्च बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत तोडगा काढला जाऊ शकतो. असंही यावेळी बचू कडू यांनी शेतकऱ्यांना म्हटलं आहे.
अजित दादांचं मराठी प्रेम! यंदाच्या अर्थसंकल्पात मराठी भाषा भवनासाठी 100 कोटींची तरतुद
मागील वर्षात राज्यात जोरदार पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. कापणीला आलेले सर्व पीक पावसामुळे वाया गेले. राज्य सरकारकडून या शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली होती. परंतु अद्यापही ती मदत शेतकऱ्यांना पर्यंत अजूनही पोहचली नाही.
Read also:
- पवार साहेबच महाराष्ट्रात दाऊदचा माणूस! देशमुखांचा राजीनामा झटपट कसा घेतला निलेश राणेंचा सवाल
- केंद्रीय समितीचा आदेश येताच गोव्यात सरकार स्थापन करणार
- ..तर तुम्ही मुंबईलाही केंद्रशासीत प्रदेश केलं असतं; युपी निकालांवरून रोहित पवारांचा भाजपला टोला
- उधारीचा वायदा करणार अन् जबाबदारी टाळणारा राज्याचा अर्थसंकल्प
- अर्थसंकल्प 2022! पुणे जिल्ह्यांसाठी अजित दादांनी दिलं भरभरून निधी