मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या गौप्यस्फोटानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. सरकारी वकिल प्रवीण चव्हाण आणि सरकार विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यावर आता प्रवीण चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यात आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
पवार साहेबच महाराष्ट्रात दाऊदचा माणूस! देशमुखांचा राजीनामा झटपट कसा घेतला निलेश राणेंचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांनी 125 तासांचे रेकॉर्डिंग असलेलं पेन ड्राईव्ह हे उपाध्यक्षाकडे सोपवलं. त्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार, अजित पवार,जयंत पाटील, नवाब मलिक या प्रमुख नेत्यांचा उल्लेख आहे. त्यावर प्रवीण चव्हाण म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या व्हिडीओमध्ये मोडतोड केली आहे. त्यातील व्हिडीओ आणि ऑडिओ वेगवेगळे आहेत. त्यामुळे हे सर्व रेकॉर्डिंग समोरं येण्याची गरज आहे.
केंद्रीय समितीचा आदेश येताच गोव्यात सरकार स्थापन करणार
तेजस मोरे हा मुळचा जळगावाचा आहे. तो माझ्या ऑफिसात अशील म्हणून काम करत होता. तेजस मोरेने हे स्टिंग ऑपरेशन केलं आहे. त्यासाठी त्याने समोरच्या काचेच्या भिंतीवर लावायला घड्याळ भेट दिलं आणि त्यात छुपा कॅमेरा बसवला. तेजस मोरे तुरूंगात जामिनासाठी तो माझ्याकडे येत होता. असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळचं वळण लागण्याची शक्यता आहे.
..तर तुम्ही मुंबईलाही केंद्रशासीत प्रदेश केलं असतं; युपी निकालांवरून रोहित पवारांचा भाजपला टोला
अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर धक्कादायक आरोप लावले होते. भाजप नेते गिरीश महाजन यांना मोक्का लावणं, तसेच त्यांच्यावरोधात कटकारस्थान रचणे, असे आरोप केले आहेत.
Read also:
- फडणवीसांना चौकशी दरम्यान नाहक त्रास दिला तर याद राखा! फडणवीसांना नोटीस आल्यानंतर पाटलांची प्रतिक्रिया
- त्यांनी या वयात अशी हास्यास्पद विधानं करू नये; कुमार केतकरांच्या वक्तव्याला फडणवीसांचं प्रत्युत्तर
- घोटाळेबाजांना उघड करण्याचा किरीट सोमय्याचा गुन्हा करत असेल, तर एक हजार वेळा करणार
- सरकारने घोटाळा दाबण्याकरता गुन्हा दाखल केला; उद्या बीकेसीच्या सायबर सेलमध्ये हजर राहणार : फडणवीस
- बच्चू कडू सर्वांचा बाप! उद्याच मंत्रिपदाचा राजीनामा देतो; बच्चू कडू यांचं वक्तव्य