मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काल सीपीआयपीने नोटीस पाठवली आहे. पोलीस बदल्यांच्या घोटाळ्या संदर्भात बीकेसी पोलिसांनी त्यांना उद्या अकरा वाजता बीकेसी पोलीस सायबर सेल याठिकाणी बोलवले आहेे. तसेच त्याठिकाणी मी जाऊन राज्य सरकारचा भांडाफोड करणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. परंतु आता त्यांनी ट्विट करत पोलिस ठाण्यात जाणार नसल्याची माहिती दिली आहे.
सरकारने घोटाळा दाबण्याकरता गुन्हा दाखल केला; उद्या बीकेसीच्या सायबर सेलमध्ये हजर राहणार : फडणवीस
मार्चमध्येच मी एक वर्षापूर्वी पोलीस बदल्यांचा घोटाळा बाहेर काढला होता. यांसंबंधी मी सगळी माहिती गृहमंत्रालयाला दिली होती. तसेच यासंबंधी प्रकरणाचा गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने हा प्रकरण सीबीआयकडे देण्यात आला. अनिल देशमुख यांची देखील यांसबंधी चौकशी सुरू आहे. हा घोटाळा दाबण्यासाठी राज्य सरकारने गुन्हा दाखल केला होता. यासंबंधी मला सीआरपीसीची पोलिसांकडून नोटीस पाठवून बीकेसीच्या सायबर सेलमध्ये बोलवलं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं.
बच्चू कडू सर्वांचा बाप! उद्याच मंत्रिपदाचा राजीनामा देतो; बच्चू कडू यांचं वक्तव्य
त्यानंतर त्यांनी पुन्हा ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, सहपोलिस आयुक्त, गुन्हे यांचा दूरध्वनी मला आत्ता आला होता. त्यांनी सांगितले की, तुम्ही पोलिस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ. तसेच देवेंद्र फडणवीसांनी उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असुन दिवसभर घरी उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे.
पवार साहेबच महाराष्ट्रात दाऊदचा माणूस! देशमुखांचा राजीनामा झटपट कसा घेतला निलेश राणेंचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नोटीस पाठवल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. घोटाळ्यात थेट सहभाग दिसतो म्हणून चौकशीला बोलावले की, राजकीय सूडबुद्धी असे तुणतुणे वाजवता. मग..घोटाळा झाल्याचे ज्यांनी उघड केले त्यांनाच दोषी असल्यासारखे चौकशीला बोलावता ही काय बालबुध्दी? लक्षात असू द्या,झुकणार नाही! वाघाच्या जबड्यात घालून हात दात मोजणाऱ्यांची आमची जात. असं त्यात त्यांनी म्हटलं आहे.
Read also:
- महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, जोपर्यंत..; रामदास आठवले यांचं खळबळजनक वक्तव्य
- भिंतीवरच्या घड्याळ्यानेच काढला काटा! फडणवीसांच्या आरोपांवर वकिल प्रवीण चव्हाणांचा खुलासा
- फडणवीसांना चौकशी दरम्यान नाहक त्रास दिला तर याद राखा! फडणवीसांना नोटीस आल्यानंतर पाटलांची प्रतिक्रिया
- त्यांनी या वयात अशी हास्यास्पद विधानं करू नये; कुमार केतकरांच्या वक्तव्याला फडणवीसांचं प्रत्युत्तर
- घोटाळेबाजांना उघड करण्याचा किरीट सोमय्याचा गुन्हा करत असेल, तर एक हजार वेळा करणार