मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राइव्ह बॉम्ब फोडत महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आणि थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारचे जनक शरद पवार यांच्यावर बाण सोडला. फडणवीसांना घेरण्यासाठी म संयमी नेतृत्व असणाऱ्या गृहमंत्री वळसे पाटलांनी उत्तर देण्याचे ठरवले.
उद्या प्रत्येक जिल्ह्यात नोटिशीची होळी करणार: प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना थेट चौकशीची नोटीस या प्रकरणात धाडण्यात आली आणि राजकीय वातावरणाने थेट पेट घेतला. विरोधी पक्ष नेते यांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याचे कळताच भाजप आक्रमक झाली आणि थेट महाराष्ट्रभर आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर पोलिसांनी माहिती दिली की देवेंद्र फडणवीस यांची चौकशी ही त्यांच्या राहत्या घरीच होणार आणि फडणवीसांची चौकशीही झाली. दुसरीकडं या प्रकरणात समावेश असणारे सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनीही या प्रकरणात काही धक्कदायक खुलासे केले आणि हा सर्व बनाव कोणी केला, कॅमेरा कोणी लावला, काय झालं हे सर्व सांगितलं.
आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत मलिकांचा राजीनामा नाहीच! जयंत पाटलांनी आता स्पष्टच केलं
यावर आता भाजपचे नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारी वकील प्रवीणचव्हाण जर इतकेच खरं बोलतं असतील तर त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी केली आहे. सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे कोणाच्या इशाऱ्यावर काम करतात हे सगळ्यांना माहित आहे आणि सत्य लवकरच बाहेर येईल.
फडणवीसांना पोलीस ठाण्यात येण्याची आवश्यकता नाही; घरीच चौकशी करणार : मुंबई पोलीस
अहमदनगरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक हे याबाबत अधिक माहिती देऊ शकतात असा खुलासा देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केला आहे. आता महाविकास आघाडी सरकार याला काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also:
- “मुख्यमंत्री महोदय, तिचा पूजा चव्हाण होऊ देऊ नका “; रघुनाथ कुचिकवर कारवाईसाठी चित्रा वाघ यांची आर्त हाक
- देवेंद्र फडणवीस काय कायद्यापेक्षा मोठे आहेत काय संजय राऊतांची फडणवीसांवर सडकून टीका
- ” अन अजित पवारांनी भाषण थांबवलं..” ; अजित दादांच्या सर्वधर्म समभावाची अख्या पुण्यात चर्चा
- फडणवींसाना आरोपी म्हणून नोटीस पाठवली नाही; दंगा करण्याची काय गरज दिलीप वळसे पाटील
- राज्यांत पोलीस बदल्यांचा महाघोटाळा! घोटाळा दाबण्याचा सरकारचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीस