मुंबई : फोन टॅफिंग आणि पोलीस बदल्यांच्या घोटाळ्याप्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाव नोंदवण्यात आला. याचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशानादरम्यान विधानसभेत देखील उमटले. त्यावर भाजपने आणलेल्या स्थगन प्रस्तावाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यावर कुणालाही फसवण्याचा प्रयत्न सरकार करीत नसून या वाद थांबवावा असं आव्हान दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांना केलं. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
देवेंद्र फडणवीस काय कायद्यापेक्षा मोठे आहेत काय संजय राऊतांची फडणवीसांवर सडकून टीका
पोलीस बदल्यांच्या घोटाळा आणि आयुक्त रश्मी शुक्ला यांचं फोन टॅपिंग प्रकरणावरून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नोटीस पाठवण्यात आली होती. त्यावर त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी काही प्रश्न विचारले तर त्यांनी त्या प्रश्नांचे उत्तर द्यायला हवे. असं दिलीप वळसे पाटलांनी म्हटलं होतं.
” अन अजित पवारांनी भाषण थांबवलं..” ; अजित दादांच्या सर्वधर्म समभावाची अख्या पुण्यात चर्चा
दिलीप वळसे पाटलांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला पाठवलेल्या प्रश्नांवर मी लेखी उत्तर देणार असल्याचं मी म्हटलं होतं. काल मला पाठवलेले प्रश्न आणि विचारलेल्या प्रश्नांमध्ये फरक होता. जाणीवपुर्वक विचारलेल्या प्रश्नांमध्ये मोडतोड करून मला सहआरोपी बनवता येतं का ? असा प्रयत्न झाला. तरी मी जबाबदारीने प्रश्नांची उत्तरं दिली, असंही ते म्हणाले.
फडणवींसाना आरोपी म्हणून नोटीस पाठवली नाही; दंगा करण्याची काय गरज दिलीप वळसे पाटील
दरम्यान, प्रश्न कुणी आणि कसे बदलले हे मला माहिती आहे. पंरतु त्याने काही फरक पडत नाही. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना माझ्या वडिलांना दोन वर्ष तुरुंगात ठेवले होते. त्यामुळे तुरूंगात जाण्यासाठी घाबरणारे नाहीत. त्यांनी प्रश्नावली बदलली त्यांनी लक्षात घ्यावं की आम्ही भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर शेवटपर्यंत लढत राहू, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Read also:
- पंतप्रधानांबद्दल बोललं की लगेच देशद्रोहाचा गुन्हा, मग मुख्यमंत्र्यांनावर देखील बोलू नये; उदय सामंत
- योगी महाराजांनी देशाचं वाटोळ केलंय, त्यांची जागा मठातच! प्रणीती शिंदे यांची सडाडून टीका
- नोटीस आम्हालाही येतात परंतु आम्ही तमाशा केला नाही! संजय राऊतांचा भाजपला खोचक टोला
- ” सत्य बाहेर आण्यासाठी सरकारी वकील प्रवीण चव्हाणांची नार्को टेस्ट करा”; विखे पाटलांची सरकारला मागणी
- “मुख्यमंत्री महोदय, तिचा पूजा चव्हाण होऊ देऊ नका “; रघुनाथ कुचिकवर कारवाईसाठी चित्रा वाघ यांची आर्त हाक