मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दाखल केलेली इडी विरोधात याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. इडीने केलेली अटक कारवाई आणि त्यानंतर विशेष पीएमएलए न्यायालायने सुनावलेला कोठडी आदेश बेकायदा असल्याचा दावा करत याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. नवाब मलिक यांनी दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेतील अंतरिम सुटकेचा विनंती अर्ज न्यायमुर्ती प्रसन्ना व न्यायमूर्ती श्रीराम मोडके यांच्या खंडपीठाने फेटाळला.
नवाब मलिक यांनी सुडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप ईडीवर लावला होता. तसेच ज्या प्रकरणात ही चौकशी करण्यात येत होती. त्यासंदर्भात कायदाच झाला नसल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. संबंधित प्रकरणात नवाब मलिक यांना चौकशीसाठी बोलवून माहिती घेता येते. पंरतु नवाब मलिक यांना कोठडी सुनावण्यात आली असल्याचं नवाब मलिक यांचे वकिल यांनी म्हटले आहे.
चक्क दाऊदची माणसं आपण वक्फ बोर्डावर नियुक्त केलीत! देवेंद्र फडणवीसांनी सादर केला दुसरा पेन ड्राईव्ह
नवाब मलिक यांना 13 दिवासांच्या पोलीस कोठडीनंतर अद्यापही दिलासा मिळालेला नाही आहे. त्यानंतर त्यांच्या पोलीस कोठडीत अजून 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची रवानगी आता आर्थर तुरूंगात करण्यात आली आहे. दाऊद इब्राहिम यांच्या संबंधित जमीन व्यवहार केल्याप्रकरणी नवाब मलिकांवर कारवाई करण्यात आली आहे.
विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी फोडला दुसरा राजकीय बॉम्ब! राज्यात एकच खळबळ
नवाब मलिकांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिकांच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नवाब मलिकांचा कोणत्याही परिस्थितीत राजीनामा घेणार नसल्याचं म्हटलं होतं. नवाब मलिकांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यनंतर आता त्यांचा राजीनामा घेतला जाईल की नाही,ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- ईडीच्या कारवाई प्रकरणी नवाब मलिकांना उच्च न्यायालयचा झटका ; याचिका फेटाळल्याने मलिक अडचणीत
- प्रवीण देरकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता! मुंबै जिल्हा बॅंक निवडणुक प्रकरणी गुन्हा दाखल
- पुण्यात इच्छुकांच्या भाऊ-गर्दीचा लाखोंचा खर्च पाण्यात; प्रभाग रचना रद्द झाल्याने भावी नगरसेवक हवालदिल
- ” खासदार सुजय हा अत्यंत नम्र अन् विनयशील “; खासदार सुजय विखेंबद्दल बाळा नांदगावकरांचे आपुलकीचे बोल
- लांबे यांच्यासोबत फडणवीसांचा फोटो व्हायरल! मलिकांवर केलेल्या आरोपांबद्दल सना मलिकने फडणवीसांची हवाच काढली;