मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फोन टॅपिंग प्रकरणासंबंधी महाविकास आघाडी सरकार विरूद्ध पुरावा म्हणून एक पेन ड्राईव्ह सादर केला. तसेच या प्रकरणाची सीबीआयने चौकशी केली पाहिजे अशी देखील देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या या आरोपावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पलटवार करत काही राजकीय घटनेचा उलगडा केला. यात राज्यातील विविध नेत्यांची नावे समोर आली आहेत.
” खासदार सुजय हा अत्यंत नम्र अन् विनयशील “; खासदार सुजय विखेंबद्दल बाळा नांदगावकरांचे आपुलकीचे बोल
दिलीप वळसे पाटील यांनी असे सांगितले की, मागील काही वर्षांपूर्वी 2015 ते 2019 या काळातील फोन टॅपिंगच्या संदर्भात पडताळणी करण्यासाठी शासनाने 9 सप्टेंबर 2019 ला आदेश काढला. यासाठी पोलीस संचालक महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती केली. सदर उच्चस्तरिय समितीला 15 ते 19 या काळातील फोन टॅपिंगचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या समितीने पूर्ण तपास झाल्यावर तो अहवाल राज्य सरकारकडे दिला. त्यानंतर तो अहवाल राज्य सरकारनं स्वीकारला. त्या उच्च स्तरीय समितीने सादर केलेल्या अहवालातून पुढे काय आलं, यावर प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न करतो. असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
ते पुढे म्हणाले की, वर्षे 2017 ते वर्षे 2018 या काळात रश्मी शुक्ला या पुणेच्या आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. रश्मी शुक्ला यांनी 4 लोकप्रतिनिधी चे 6 भ्रमणध्वनी टॅप केल्याचं समोर आलं आहे. यामध्ये नाना पटोले यांचे नाव अमजद खान होतं, तर विद्यमान राज्यमंत्री बच्चू कडू यांचं नाव निजामुद्दीन बाबू शेख होते. संजय काकडे हे तर त्यावेळी भाजपचे खासदार होते, आणि त्यांचं नाव ठेवलं होतं तरबेज सुतार. तसेच आशिष देशमुख त्यावेळी भाजपचेच आमदार होते, त्यांच नाव ठेवलं होतं रघू चोरगे. आशिष देशमुखांचा दुसरा फोन, त्यांचं नाव ठेवलं हिना महेश साळुंके. विशेष म्हणजे या दिलेल्या अहवालात रश्मी शुक्ला यांच्याबद्दल गंभीर बाबी नमूद करत दिलीप वळसे पाटील यांनी भाजपला एकप्रकारे इशारा दिला आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या राजकिय गौप्यस्फोटामुळे आता राजकीय वातावरण पुन्हा नव्याने तापण्याची शक्यता आहे. तसेच यावर आता बच्चू कडू काय प्रतिक्रिया देणार, त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
Read also:
- “घर का काॅंग्रेस नकोय, सब की काॅंग्रेस हवंय”; ज्येष्ठ काॅंग्रेस नेते कपिल सिब्बल यांचं वक्तव्य
- नवाब मलिकांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
- ईडीच्या कारवाई प्रकरणी नवाब मलिकांना उच्च न्यायालयचा झटका ; याचिका फेटाळल्याने मलिक अडचणीत
- प्रवीण देरकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता! मुंबै जिल्हा बॅंक निवडणुक प्रकरणी गुन्हा दाखल
- पुण्यात इच्छुकांच्या भाऊ-गर्दीचा लाखोंचा खर्च पाण्यात; प्रभाग रचना रद्द झाल्याने भावी नगरसेवक हवालदिल