मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी इडीविरोधात केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच नवाब मलिकांच्या पोलीस कोठडीत देखील तब्बल 14 दिवासांची वाढ करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होत असताना भाजपकडून नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार राम सातपूते यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
प्रवीण देरकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता! मुंबै जिल्हा बॅंक निवडणुक प्रकरणी गुन्हा दाखल
राम सातपुते म्हणाले की, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावाच लागेल. आज मुंबई हायकोर्टाने ही अटक कायदेशीरच आहे असे सांगून याचिका फेटाळली आहे . सरकारने राजीनामा घ्यावा किंवा नवाब मलिकला या ठाकरे -पवार सरकारने सरकारी जावई म्हणून घोषीत तरी करावे, अशी शेलक्या शब्दात राम सातपुते यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच नवाब मलिकांच्या कोठडीत वाढ झाल्यानंतर भाजपच्या इतर नेत्यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
” खासदार सुजय हा अत्यंत नम्र अन् विनयशील “; खासदार सुजय विखेंबद्दल बाळा नांदगावकरांचे आपुलकीचे बोल
नवाब मलिक यांनी सुडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप ईडीवर लावला होता. तसेच ज्या प्रकरणात ही चौकशी करण्यात येत होती. त्यासंदर्भात कायदाच झाला नसल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. संबंधित प्रकरणात नवाब मलिक यांना चौकशीसाठी बोलवून माहिती घेता येते. पंरतु नवाब मलिक यांना कोठडी सुनावण्यात आली असल्याचं नवाब मलिक यांचे वकिल यांनी म्हटले आहे.
नवाब मलिक यांना 13 दिवासांच्या पोलीस कोठडीनंतर अद्यापही दिलासा मिळालेला नाही आहे. त्यानंतर त्यांच्या पोलीस कोठडीत अजून 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची रवानगी आता आर्थर तुरूंगात करण्यात आली आहे. दाऊद इब्राहिम यांच्या संबंधित जमीन व्यवहार केल्याप्रकरणी नवाब मलिकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता आहे.
मंत्री नवाब मलिक चा राजीनामा घ्यावाच लागेल . आज मुंबई हायकोर्टाने ही अटक कायदेशीरच आहे असे सांगून याचिका फेटाळली आहे .
सरकारने राजीनामा घ्यावा किंवा नवाब मलिक ला या ठाकरे -पवार सरकारने सरकारी जावई म्हणून घोषणा तरी करावी . @AjitPawarSpeaks @OfficeofUT @Dev_Fadnavis— Ram Satpute (@RamVSatpute) March 15, 2022
Read also:
- रुकावटे है ज़रूर पर हौसले ज़िंदा है! 14 दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर नवाब मलिकांची प्रतिक्रिया व्हायरल
- बच्चू कडूंचं नाव निजामुद्दीन शेख तर पटोलेंचा अमजद खान; वळसे पाटलांनी केला घटनेचा उलगडा
- “घर का काॅंग्रेस नकोय, सब की काॅंग्रेस हवंय”; ज्येष्ठ काॅंग्रेस नेते कपिल सिब्बल यांचं वक्तव्य
- नवाब मलिकांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
- ईडीच्या कारवाई प्रकरणी नवाब मलिकांना उच्च न्यायालयचा झटका ; याचिका फेटाळल्याने मलिक अडचणीत