मुंबई : राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशात सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलचं चिघळलं आहे. महाविकास आघाडी सरकार आणि सत्ताधारी पक्षांमध्ये आरोप-पत्यारोपांची मालिका अद्यापही संपण्याचे नाव घेत नाही. अशातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे.
बच्चू कडूंचं नाव निजामुद्दीन शेख तर पटोलेंचा अमजद खान; वळसे पाटलांनी केला घटनेचा उलगडा
कर्नाटक मधील हिजाब वादाचे पडसाड विधानसभेत देखील बघायले मिळाले. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, शैक्षणिक संस्थांमध्ये कोर्टाचा हिजाब बंदीचा निर्णय स्वागतार्ह आहे. यानिमित्ताने मुस्लिम समाजाला माझा आग्रह आहे की, मुस्लिम समाजातील जर कोणी व्यक्ती बेकायदेशीर, असंवैधानिक किंवा देशविरोधी कृत्य करत असेल, तर अशा व्यक्तीपासून दूर राहा. मुस्लिम समाजातील तरुणांची माथी भडकवून स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या त्या समाजातील पुढाऱ्यांना आणि अनेक राजकीय पक्षांना ही मोठी चपराक आहे. महाराष्ट्रातही मविआ सरकारच्या मदतीने काही संघटना हे प्रकरण तापवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे निंदनीय असल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
“घर का काॅंग्रेस नकोय, सब की काॅंग्रेस हवंय”; ज्येष्ठ काॅंग्रेस नेते कपिल सिब्बल यांचं वक्तव्य
जब होगी किताब तब नही चलेगा हिजाब! असं म्हणत चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, मागील काही दिवसांपासून देशात हिजाब या विषयाला हाताशी धरत समाजकंटकांकडून धार्मिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आज याच विषयात निर्णय देताना कर्नाटक हायकोर्टाने हिजाब हा इस्लामचा मुख्य पेहराव नसल्याचे म्हणत सर्व याचिका फेटाळल्या आहेत. असंही ते म्हणाले.
नवाब मलिकांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
महाविकास आघाडीवर देखील त्यांनी यावेळी कडाडून टिका केली आहे. महाविकास आघाडी सरकार झुकती है. बस झुकानेवाला चाहिए. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून भाजपने लावूनधरलेल्या शेतकऱ्यांच्या वीजतोडणी संदर्भात अखेर मविआ सरकारला नमावेच लागले. त्यानंतर वीजतोडणी तात्काळ थांबवण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यांने दिले असल्याचं त्यांनी सांगितलं.
Read also:
- ” दरेकरांनी त्यांचं नाव बदलून दरोडेखोर ठेवावं”; नाना पटोलेंची दरेकरांवर जहरी टीका
- भाजपला ते आंदोलन भोवलं; भाजपच्या आमदारासह अन्य 23 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
- ” दरेकरांवरील कारवाई सूडबुद्धीने नव्हे तर सडक्या बुद्धीने “; आशिष शेलारांचा राज्य सरकारवर घणाघात
- मलिकांचा राजीनामा घ्या; नाही तर ठाकरे-पवार सरकारने सरकारी जावई घोषीत करा: राम सातपुते
- रुकावटे है ज़रूर पर हौसले ज़िंदा है! 14 दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर नवाब मलिकांची प्रतिक्रिया व्हायरल