मुंबई : गेल्या महिन्यात मुंबै जिल्हा सहकारी बँकेचा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकार आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आक्रमक खेळीमुळे महाविकास आघाडीचा जिल्हा बँकेत दणदणीत विजय झाला. यानंतर माजी अध्यक्ष प्रवीण दरेकर यांचे बँकेचे सदस्यत्व रद्द झाले झाले.
“घर का काॅंग्रेस नकोय, सब की काॅंग्रेस हवंय”; ज्येष्ठ काॅंग्रेस नेते कपिल सिब्बल यांचं वक्तव्य
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचे प्रतिसाद आज विधानसभेत पाहायला मिळाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधिमंडळात आक्रमक भूमिका घेतली आहे. जर महाविकास आघाडी सरकार आमच्यावर जाणून बुजून अशा प्रकारची कारवाई करणार असेल तर आम्ही अजिबात शांत बसणार नाही. अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
नवाब मलिकांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
आशिष शेलार आणि भाजपच्या इतर नेत्यांनी देखील याबाबत आपली भूमिका मांडली आहे. आता सत्ताधारी पक्षाकडून देखील भाजपला त्याच भाषेत उत्तर देण्यात येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपच्या नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रवीण दरेकरांनी मुंबै जिल्हा बँक लुटून खाल्ली आहे. त्यांचे नाव दरेकर बदलून दरोडेखोर ठेवावे. हा गुन्हा पोलिसांनी अत्यंत योग्य पद्धतीने दाखल केला आहे. दोन दोन कोटींच्या गाडीत फिरणारे कधीही मजूर नसतात हे कोणीही सांगेल असं देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
ईडीच्या कारवाई प्रकरणी नवाब मलिकांना उच्च न्यायालयचा झटका ; याचिका फेटाळल्याने मलिक अडचणीत
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर बॅंकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणुक लढवली असल्याने त्यांच्यावर मुंबई पोलिसांकडून माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता प्रवीण दरेकर यांच्यावर कशा पद्धतीने कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Read also:
- भाजपला ते आंदोलन भोवलं; भाजपच्या आमदारासह अन्य 23 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
- ” दरेकरांवरील कारवाई सूडबुद्धीने नव्हे तर सडक्या बुद्धीने “; आशिष शेलारांचा राज्य सरकारवर घणाघात
- मलिकांचा राजीनामा घ्या; नाही तर ठाकरे-पवार सरकारने सरकारी जावई घोषीत करा: राम सातपुते
- रुकावटे है ज़रूर पर हौसले ज़िंदा है! 14 दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर नवाब मलिकांची प्रतिक्रिया व्हायरल
- बच्चू कडूंचं नाव निजामुद्दीन शेख तर पटोलेंचा अमजद खान; वळसे पाटलांनी केला घटनेचा उलगडा