मुंबई : राज्यातील विधानसभेत राज्याचे विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस यांनी पेन ड्राईव्हसह पुरावे सादर करत खळबळ उडवून दिली. त्यानंतर राज्यात आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली. मागच्या वर्षी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपविरोधातली सीडी चर्चेत होती. त्यानंतर त्यांनी परत एकदा त्यावर भाष्य केलं आहे.
महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपवर करीत आहे. यावरून एकनाथ खडसे यांनी भाजपवर माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावीन असा इशारा दिला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह सादर केल्यानंतर सीडी कधी सादर करणार अशा चर्चा रंगल्या. त्यावर ते म्हणाले की, वेळ आली की मी ती सीडी बाहेर काढणार आहे.
नेत्यांचे फोन टॅप करण्याचा गुजरात पॅटर्न समोर आणणार; रश्मी शुक्ला प्रकरणावरून पटोलेंचा इशारा
एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, दाऊदशी संबंध जोडल्याने प्रसिद्धी मिळते, माझंही तशाचे प्रकारे संबंध जोडले गेले. त्यामुळे अशा प्रकारच्या सीडी, पेन ड्राईव्ह मी खुपदा पाहिले आहेत. त्याच्यातील तथ्य चौकशीतून बाहेर येईल, असंही ते म्हणाले.
दिशा सालीयन प्रकरणी राणे पिता पुत्राला जामीन मंजूर होताच; नितेश राणेंचा राज्य सरकारवर पलटवार
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण विविध मुद्यांवरून चांगलचं तापलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत फोडलेल्या राजकीय बॉम्बनंतर देशात एकच खळबळ उडाली होती. मात्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकारणाची चौकशी केली जाईल, असं म्हटलं आहे.
Read also:
- “आमचे आई-बाप काढू नका “; केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना सुप्रिया सुळेंनी झाप-झाप झापलं
- प्रवीण दरेकरांना उच्च न्यायालयाचा दणका; मुंबै बॅंक निवडणुक प्रकरणी याचिका फेटाळली
- “भारतामधील रस्त्यांचं जाळं 2024 पर्यंत अमेरिकेच्या बरोबरीचे असणार” ; नितीन गडकरी
- “कुठं मरगळ आली असेल तर झटकून टाकावी”; शिवसेनेचे 22 मार्चपासून शिवसंपर्क अभियान
- महाराष्ट्रातचं काय? काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत करा ना टॅक्समुक्त; काश्मिर फाईल्स चित्रपटावरून अजित पवारांनी सुनावलं