नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जम्मू काश्मीरच्या अर्थसंल्पावर झालेल्या चर्चेत संसदेत सहभाग नोंदवला होता. या चर्चेच्या सत्रात सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार सडकून टीका केली आहे. त्यामुळे राज्यात सध्या सुप्रिया सुळे यांची चर्चा जोरदार सुरू आहे.
नेत्यांचे फोन टॅप करण्याचा गुजरात पॅटर्न समोर आणणार; रश्मी शुक्ला प्रकरणावरून पटोलेंचा इशारा
आम्हाला काश्मीर खूप आवडतं, आम्ही नेहमीच काश्मीरच्या सफरीवर जात असतो. या पृथ्वीवर जर कोणी स्वर्ग बघितला असेल तर तो स्वर्ग भारतात आहे आणि त्याचं नाव आहे काश्मीर. आम्ही फिरण्यासाठी कधीही जास्त करून बाहेरच्या देशात जात नाही कारण आम्हाला सहकुटुंबाला काश्मीरला जायला खूप आवडतं. यामुळे काश्मीर हे आमचे फिरण्याचे आवडते ठिकाण आहे, असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
दिशा सालीयन प्रकरणी राणे पिता पुत्राला जामीन मंजूर होताच; नितेश राणेंचा राज्य सरकारवर पलटवार
काश्मीरी पंडितांवर झालेल्या अन्यायाबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे भरपूर बोलले मात्र ज्या काश्मिरी पांडितांच्या मुलांसाठी दिल्लीत शाळा सुरु आहे त्या शाळेला केंद्र सरकारच्या विविध विभागाकडून का नोटिसा दिल्या जातात ? असा सवालही सुप्रिया सुळेंनी विचारला. दुसऱ्यावर आरोप करणं हे नक्कीच सोपं असतं मात्र तुम्ही काश्मीरमध्ये काय विकास केला ? हे देखील समोर आणा.
दिशा सालीयन प्रकरणी राणे पिता पुत्राला जामीन मंजूर होताच; नितेश राणेंचा राज्य सरकारवर पलटवार
सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना जितेंद्र सिंह यांनी म्हटलं की आमच्या आई-वडिलांनी काय केलं हे आम्ही कशाला बोलू, अशी भावना काहींची आहे. त्याबद्दल नाही बोलले तरी चालेल. मात्र तुमच्या घरच्यांमुळे तुम्ही सक्षम झाला आहात आणि म्हणूनच तुम्ही आज संसदेत बसला आहेत असं जितेंद्र सिंह यांनी सुळेंना सुनावलं. यावरून सुप्रिया सुळे यांनी जितेंद्र सिंह यांना चांगलंच झापून काढलं आहे. आम्ही आमच्या घराण्याबद्दल नेहमीच चांगलं बोलतो. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झालेला सगळ्यांना चालतो मात्र राजकारण्यांची मुले राजकारणात आली की भाजपच्या पोटात गोळा येतो. आई-वडील सोडून काहीही बोला. पण आई-बाप काढू नका, असा टोला यावेळी सुप्रिया सुळे यांनी लगावला.
Read also:
- प्रवीण दरेकरांना उच्च न्यायालयाचा दणका; मुंबै बॅंक निवडणुक प्रकरणी याचिका फेटाळली
- “भारतामधील रस्त्यांचं जाळं 2024 पर्यंत अमेरिकेच्या बरोबरीचे असणार” ; नितीन गडकरी
- “कुठं मरगळ आली असेल तर झटकून टाकावी”; शिवसेनेचे 22 मार्चपासून शिवसंपर्क अभियान
- महाराष्ट्रातचं काय? काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत करा ना टॅक्समुक्त; काश्मिर फाईल्स चित्रपटावरून अजित पवारांनी सुनावलं
- स्वातंत्र्यसैनिक भगतसिंह यांच्या मुळ गावी झाला भगवंत मान यांचा शपथविधी; पंजाबनंतर आपचं पुढचं नियोजन ठरलं