सोलापूर : गेल्या काही महिन्यापासून चर्चेत असलेल्या करूणा मुंडे यांनी अजून एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसेचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी असं महाराष्ट्राच्या राजकारणावर धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढला तर तो सुपर डुपर चालेल असं वक्तव्य करूणा मुंडे यांनी केले आहे.
प्रवीण दरेकरांना उच्च न्यायालयाचा दणका; मुंबै बॅंक निवडणुक प्रकरणी याचिका फेटाळली
मागील वर्षी धनंजय मुंडे यांच्यावर करूणा शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केला होता. तेव्हापासून त्या राज्यात चर्चेत होत्या. त्यावेळी अनेक राजकीय घडामोडी देखील घडल्या होत्या. त्यानंतर त्यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या शिवशक्ती सेना असं नाव ठेवून नवीन पक्ष स्थापन केला आहे. या पक्षाच्या नावावर त्या आता धनंजय मुंडे यांच्या विरोधात आपण परळीतून तर कोल्हापूरच्या उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत देखील उतरणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
“भारतामधील रस्त्यांचं जाळं 2024 पर्यंत अमेरिकेच्या बरोबरीचे असणार” ; नितीन गडकरी
करूणा मुंडे यांनी म्हटलं आहे की, मी स्वत: चा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या सारख्या अनेक मंत्र्यांच्या पत्नींवर अन्याय होत आहे. त्यातील अनेक महिला माझ्या संपर्कात आहेत, असा दावा देखील त्यांनी केला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात गेल्या 25 वर्षापासून राजकारण कसं चालतंय ही मी पाहत आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि धनंजय मुंडे यांच्यावर चित्रपट काढल्यास तो सुपर डुपर चालेल असंही वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे.
“कुठं मरगळ आली असेल तर झटकून टाकावी”; शिवसेनेचे 22 मार्चपासून शिवसंपर्क अभियान
दरम्यान, कोल्हापूर उत्तर विधानसभेचे काॅंग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर त्याठिकाणी जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत करूणा शर्मा यांनी उडी घेतली आहे. येत्या मंगळवारी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे करूणा शर्मा यांनी पंढरपूरात जाहीर केले आहे. तर भाजपकडून सत्यजीत कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर काॅंग्रेसने जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार ते आता पहावं लागणार आहे.
Read also:
- “आम्ही नुसतं म्हणायचं ठाकरे सरकार मात्र हे तर पवार सरकार “; गजानन कीर्तिकारांचा शिवसेनेला घरचा आहेर
- कोल्हापूर उत्तरेत शिवसेनेची तलवार म्यान; पारंपरिक मतदारसंघ सोडला काँग्रेसला
- ” शिवसेना हा दिशा, तत्व नसलेला पक्ष “; केंद्रीय मंत्री राणेंची शिवसेनेवर जहरी टीका
- पेन ड्राईव्हनंतर आता ‘सीडी’ बाहेर येणार; एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
- “आमचे आई-बाप काढू नका “; केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना सुप्रिया सुळेंनी झाप-झाप झापलं