कोल्हापूर : काॅंग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक होत आहे. या निवडणुकीत शिवसेनेने माघार घेतली असून ती जागा आता काॅंग्रेसला सोडली आहे. परंतु भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली आहे. याच पार्श्वभूमीवरून कोल्हापूरचे पालकमंत्री आणि काॅंग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
”धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढल्यास तो सुपर डुपर चालेल”; करूणा शर्माचं वादग्रस्त वक्तव्य
सतेज पाटील म्हणाले की, कोल्हापूर उत्तरमधील पोटनिवडणुक भाजपने लादली आहे. ही निवडणुक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा होती. यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते अनुकुल होते मात्र खालच्या नेत्यांनी अनुकुल नव्हते असं मला वाटतं. या सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आता आम्हा महाविकास आघाडी म्हणून ही निवडणुक लढत आहे. असं सतेज पाटील म्हणाले.
“आम्ही नुसतं म्हणायचं ठाकरे सरकार मात्र हे तर पवार सरकार “; गजानन कीर्तिकारांचा शिवसेनेला घरचा आहेर
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारला बदनाम करण्याचे काम भाजप करत आहे. भाजपचा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू. आपआपसात काही उणीवा असतील तर त्या बाजूला ठेवून एकसंघपणे ही निवडणुक लढविण्याची सर्वांची भूमिका असल्याचंही सतेज पाटील म्हणालेत. तसेच या पोट निवडणुकीत आम्ही 100 टक्के विजयी होऊ, असा आत्मविश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
कोल्हापूर उत्तरेत शिवसेनेची तलवार म्यान; पारंपरिक मतदारसंघ सोडला काँग्रेसला
कोल्हापूर उत्तरेत विधानसभा पोटनिवडणुकीत कमालीच्या घडामोडी मागील दोन-तीन दिवसांमध्ये घडून आल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने सत्यजीत कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर काँग्रेसकडून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर शिवसेनेने पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याचं ठरवलं आहे.
Read also:
- मग तुमच्या सरकारच्यावेळी महाराजांचा विधानसभेत फोटो का नाही लावला? अजित पवारांचं भाजपला प्रत्युत्तर
- ठाकरे सरकार हे डोक्यावर पडलेलं सरकार; तथाकथित रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणी चित्रा वाघ कडाडल्या
- तथाकथित रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरण पेटलं; पीडित तरुणीचे संजय राऊत, नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप
- नारायण राणेंच्या अडचणीत वाढ; ‘अधीश’ बंगला प्रकरणी उच्च न्यायालयात धाव
- पिंपरी-चिंचवडमधील आत्मकेंद्री राजकारण्यांना आमदार महेश लांडगेंची ‘ॲ लर्जी’