मुंबई : आज संपुर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती साजरी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराजांच्या जयंतीनिमित्त वाद फेटला होता. त्याचे पडसाद आज विधानसभेत देखील बघायला मिळालेत. विधानसभेत महाराजांची प्रतिमा उपलब्ध करून त्यांना अभिवादन करण्याची सोय करावी, अशी मागणी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
“आम्ही नुसतं म्हणायचं ठाकरे सरकार मात्र हे तर पवार सरकार “; गजानन कीर्तिकारांचा शिवसेनेला घरचा आहेर
मुख्य़मंत्री आज तिथीप्रमाणं शिवजयंती साजरी करत आहेत. शिवसेनेच्या काही आमदारांनी आणि भाजपच्या आमदारांनी शिवाजी महाराजांना आज अभिवादन केलं. आपण जयंतीच्या दिवशी महामानवांच्या प्रतिमा रिफ्टरच्या समोर ठेवतो. त्यानंतर तिथं प्रत्येक सदस्य आमदार संबंधित महापुरूषाला वंदन करतात. परंतु आज सरकारची भूमिका काय ? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.
कोल्हापूर उत्तरेत शिवसेनेची तलवार म्यान; पारंपरिक मतदारसंघ सोडला काँग्रेसला
सुधीर मुनगंटीवार यांना प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले की, गेल्या पाच वर्षात भाजपचे सरकार होत, पंरतु त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणं शिवजयंती कधीही विधीमंडळात शिवाजी महाराज यांचा फोटो लावून साजरी केली नाही. मागच्या काळात दिवंगत रामकृष्ण मोरे यांनी शिवाजी महाराजांचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाल्याचं इतिहासातील नोंदीवरून निश्चित केलं आहे. तेव्हापासून राज्याचे मुख्यमंत्री शिवाजी महाराजांचा जन्म जिथं झाला तिथं अर्थात शिवनेरी गडावर शिवजयंती साजरी करतात. त्यामुळे सरकारच्यावतीनं शिवजयंती ही 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते. असंही अजित पवार म्हणाले.
कोल्हापूर उत्तरेत शिवसेनेची तलवार म्यान; पारंपरिक मतदारसंघ सोडला काँग्रेसला
दरम्यान, शिवजयंती साजरी करताना राज्य सरकारने काही नियम घालून दिले होते. परंतु यावर भाजपने आक्रमक भूमिका घेत शिवजयंती मोठ्या धुमधड्याक्यात साजरी केली जाईल,असं म्हटलं होतं. तर मनसेने देखील आज विविध ठिकाणी राज्य सरकाच्या नियमांना डावलून शिवजयंती साजरी केली.
Read also:
- ठाकरे सरकार हे डोक्यावर पडलेलं सरकार; तथाकथित रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणी चित्रा वाघ कडाडल्या
- तथाकथित रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरण पेटलं; पीडित तरुणीचे संजय राऊत, नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप
- नारायण राणेंच्या अडचणीत वाढ; ‘अधीश’ बंगला प्रकरणी उच्च न्यायालयात धाव
- पिंपरी-चिंचवडमधील आत्मकेंद्री राजकारण्यांना आमदार महेश लांडगेंची ‘ॲ लर्जी’
- ”धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढल्यास तो सुपर डुपर चालेल”; करूणा शर्माचं वादग्रस्त वक्तव्य