पुणे : शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरूणीने लग्नाचं आश्वासन देऊन बलात्कार आणि नंतर गर्भपात करायला भाग पाडल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. या घटनेवर भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आवाज उठवला. या प्रकरणी त्यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी लक्ष्य घालून तरूणींना न्याय मिळावं अशी मागणी केली आहे. तसेच त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका देखील केली आहे.
कोल्हापूर उत्तरेत शिवसेनेची तलवार म्यान; पारंपरिक मतदारसंघ सोडला काँग्रेसला
या प्रकरणावरून त्यांनी ठाकरे सरकारवर टीका करताना म्हणाले की, ठाकरे सरकार हे डोक्यावर पडलेलं आहे. बुलडाण्यात कुटुंब नियोजनात रबरी लिंग दिल्याने देखील चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांनी केलेल्या अत्याचाराविरोधात कारवाई करण्याची मागणी करत पुण्याचे पोलीस आयुक्तांकडून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना कारवाई होत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
” शिवसेना हा दिशा, तत्व नसलेला पक्ष “; केंद्रीय मंत्री राणेंची शिवसेनेवर जहरी टीका
या प्रकरणात पीडित तरुणीने म्हटलं आहे की, मी सर्वात पहिल्यांदा आमदार नीलम गोऱ्हे यांना फोन लावला होता मात्र त्यांनी याबाबत गांभीर्य दाखवले नाही. त्यांनी माझे फोनही उचलले नाही. त्यानंतर मी संजय राऊत यांना याबाबत सांगितले होते. सुरुवातीला त्यांनीही फोन उचलले नाही आणि नंतर नीलम गोऱ्हे यांनी मला त्यांच्या बंगल्यावर बोलवून माझ्याकडून स्त्री आधार केंद्राचा फॉर्म भरुन घेतला. पण त्यानंतर त्यांनी परत कधीही माझ्याशी संपर्क साधला नाही की संजय राऊतांनीही परत कधीही फोन केला नाही, असा दावा तरुणीने केला आहे.
पेन ड्राईव्हनंतर आता ‘सीडी’ बाहेर येणार; एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
यामुळेच सरतेशेवटी मला चित्रा वाघ यांची मदत घ्यावी लागली. चित्रा वाघ यांनी याबाबत आवाजही उठवला आणि नंतर याबाबत कारवाई देखील करण्यात आली. मात्र कारवाई अद्यापही अत्यंत संथगतीने सुरु असल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. पीडित तरुणीने आता थेट संजय राऊत आणि नीलम गोऱ्हे यांच्यावर आरोप केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
Read also:
- तथाकथित रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरण पेटलं; पीडित तरुणीचे संजय राऊत, नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप
- नारायण राणेंच्या अडचणीत वाढ; ‘अधीश’ बंगला प्रकरणी उच्च न्यायालयात धाव
- पिंपरी-चिंचवडमधील आत्मकेंद्री राजकारण्यांना आमदार महेश लांडगेंची ‘ॲ लर्जी’
- ”धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढल्यास तो सुपर डुपर चालेल”; करूणा शर्माचं वादग्रस्त वक्तव्य
- “आम्ही नुसतं म्हणायचं ठाकरे सरकार मात्र हे तर पवार सरकार “; गजानन कीर्तिकारांचा शिवसेनेला घरचा आहेर