पुणे : पुण्यातील शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरुणीने लग्नाचं आश्वासन देऊन बलात्कार आणि नंतर गर्भपात करायला लावल्याचा गंभीर आरोप मागील काही दिवसांपूर्वी केला होता. यानंतर भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याप्रकरणी आवाज उठवला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना साद घालत या प्रकरणी कारवाई करा असं म्हटलं होतं.
” शिवसेना हा दिशा, तत्व नसलेला पक्ष “; केंद्रीय मंत्री राणेंची शिवसेनेवर जहरी टीका
पीडित तरुणीवर वारंवार दबाव टाकला जात आहे अशी तक्रार चित्रा वाघ वारंवार करत होत्या. तसेच या तरुणीचे अपहरण झाले आहे असा आरोपही चित्रा वाघ यांनी मागील काही दिवसांपूर्वी केला होता. अखेर ती तरुणी समोर आली आहे आणि तिने रघुनाथ कुचिक सहित शिवसेना खासदार संजय राऊत आणि निलम गोऱ्हे यांच्यावरही धक्कदायक आरोप केले आहेत.
पेन ड्राईव्हनंतर आता ‘सीडी’ बाहेर येणार; एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
पीडित तरुणीने म्हटलं आहे की या प्रकरणात मी सर्वात पहिल्यांदा आमदार नीलम गोऱ्हे यांना फोन लावला होता मात्र त्यांनी याबाबत गांभीर्य दाखवले नाही. त्यांनी माझे फोनही उचलले नाही. त्यानंतर मी संजय राऊत यांना याबाबत सांगितले होते. सुरुवातीला त्यांनीही फोन उचलले नाही आणि नंतर नीलम गोऱ्हे यांनी मला त्यांच्या बंगल्यावर बोलवून माझ्याकडून स्त्री आधार केंद्राचा फॉर्म भरुन घेतला. पण त्यानंतर त्यांनी परत कधीही माझ्याशी संपर्क साधला नाही की संजय राऊतांनीही परत कधीही फोन केला नाही, असा दावा तरुणीने केला आहे.
“आमचे आई-बाप काढू नका “; केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना सुप्रिया सुळेंनी झाप-झाप झापलं
यामुळेच सरतेशेवटी मला चित्रा वाघ यांची मदत घ्यावी लागली. चित्रा वाघ यांनी याबाबत आवाजही उठवला आणि नंतर याबाबत कारवाई देखील करण्यात आली. मात्र कारवाई अद्यापही अत्यंत संथगतीने सुरु असल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. पीडित तरुणीने आता थेट संजय राऊत आणि नीलम गोऱ्हे यांच्यावर आरोप केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
Read also:
- नारायण राणेंच्या अडचणीत वाढ; ‘अधीश’ बंगला प्रकरणी उच्च न्यायालयात धाव
- पिंपरी-चिंचवडमधील आत्मकेंद्री राजकारण्यांना आमदार महेश लांडगेंची ‘ॲ लर्जी’
- ”धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढल्यास तो सुपर डुपर चालेल”; करूणा शर्माचं वादग्रस्त वक्तव्य
- “आम्ही नुसतं म्हणायचं ठाकरे सरकार मात्र हे तर पवार सरकार “; गजानन कीर्तिकारांचा शिवसेनेला घरचा आहेर
- कोल्हापूर उत्तरेत शिवसेनेची तलवार म्यान; पारंपरिक मतदारसंघ सोडला काँग्रेसला